पत्रकारांची वृत्तलेखन कार्यशाळा उत्साहात संपन्न..
वृत्त लेखन व मुलाखत एक तंत्र आहे. आणि हे एक कौशल्य आहे. हे आत्मसात केले पाहिजे असे प्रतिपादन दोपहर का सामना या वर्तमान पत्राचे निवासी संपादक अनिल तिवारी यांनी व्यक्त केले. हंसराज मोरारजी पब्लिक स्कूल अंधेरी या शाळेत वृत्तपत्र लेखन व मुलाखत कौशल्याचे एक विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शालेय विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमात लेखन कौशल्य अंतर्गत बातमी लेखन हा विषय आहे. यास अनुसरूनच विद्यार्थ्यांना केवळ गुणासाठी नव्हे तर सर्वांगीण विकासासाठी लेखन, संभाषण व मुलाखत कौशल्य आले पाहिजे असे मत या विशेष कार्यक्रमात उपस्थीत मार्गदर्शक पत्रकारांनी व्यक्त केले. पत्रकारांनी आपली भूमिका मांडताना स्पष्ट व निर्भयपणे मांडली पाहिजे. लेखन कार्यशाळेत इलेक्ट्रिक, डिजीटल व प्रिन्ट मिडियातील विविध पैलूंवर प्रकाश टाकला गेला. रविंद्र मिश्रा, पत्रकार अनिल पांडे, डॉ उमा, महेश ढेरे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून आजच्या आधुनिक जीवनात प्रसार माध्यमांचे महत्त्व व कार्य यावर चर्चा केली.
हंसराज मोरारजी पब्लिक स्कूल वअंधेरी या शाळेचे मुख्याध्यापक गोविंदराजन श्रीनिवासन सरांनी समाजाचा आरसा असलेली प्रसार माध्यमे व लोकशाहीचा चौथा स्तंभ याचे महत्त्व यावर आपले मत पत्रकारांशी संवाद साधताना व्यक्त केले.



