आपल खान्देश

पाचोराच्या सिंधुताई पंडीतराव शिंदे शाळेत पांडुरंगाची वारी हा भक्तीमय कार्यक्रम घेण्यात आला ..


पाचोरा शहरातील सिधुताई पंडीतराव शिंदे, प्राथमिक शाळेत आषाढी एकादशी निमित्त “पांडुरंगाची वारी” हा कार्यक्रम घेण्यात आला असता विध्यार्थीनीं विठ्ठलांची व राखमाई यांच्या वेषभुशा परिधान करून या कार्यक्रमात भाग घेतला. आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी गिरणाई शिक्षण संस्थेच्या संचालिका सौ.सिंधुताई पंडीतराव शिंदे ह्या होत्या व प्रमुख पाहुणे म्हणून सौ.सा.प.शिंदे शाळेचे मुख्याध्यापक श्री सु.ना.पाटील सर उपस्थित होते यांनी सर्व विद्यार्थ्याचे कौतूक केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्राथमिक शाळेचे उपशिक्षक श्री. प्रदीप सुनिल शिंदे सर यांनी केले. तसेच या कार्यक्रमा विषयीची माहिती शाळेचे मुख्याध्यापक श्री.समाधान माधवराव महाजन सर यांनी विद्यार्थ्यांना दिली. तसेच गिरणाई शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सन्मानीय तात्यासाहेब पंडीतराव शिंदे यांनी विद्यार्थी व शिक्षकांचे कौतुक केले .कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्रीमती. जयश्री लांडगे मॅडम यांनी केले. कार्यक्रमास नर्सरी ते इ 7वी चे सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे