जिल्हाधिकारी मित्तल यांना पाचोरा तालुक्यातील विविध समस्यासाठी बल्लाळेश्वर युवा फाऊंडेशनच्या वतीने निवेदन दिले
पाचोरा (झूम मराठी) पाचोरा शहरात आज जळगाव जिल्हाधिकारी अमन मित्तल आले असता पाचोरा उपविभागीय अधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी मित्तल यांना पाचोरा शहरातील व तालुक्यातील समस्या बाबत बल्लाळेश्वर युवा फाऊंडेशनच्या वतीने तक्रारींचे निवेदन देण्यात आले.
राज्य शुल्क उत्पादन विभागाने दारू बंदीचीच कामे केली पाहिजे, तहसीलदारांनी महसूल विभागाशी निगडीतच कामे केली पाहिजे, पोलिसांनी पोलीस विभाग निगळीत कामे केली पाहिजे, पाचोरा नगर पालिकेने शहरी समस्यांवरच कामे केली पाहिजे व सर्वसामान्य जनतेला न्याय कसे मिळेल व त्यांचे हित कसे जोपसता येईल यावर सर्व संबंधित अधिकारी व कर्मचारीनां सूचना देण्यात याव्या. व पाचोरा शहरातील मोंढाळा रोड परिसरातील सरकारी जागेवर एका कथित सरकारी बाबूने अतिक्रमण केले आहॆ त्या विरोधात योग्य ते पाऊल उचलवे व अवैध गौण खनिजाची होत असलेली चोरी पकडण्यासाठी गस्तीवर निघतांना परस्पर खाजगी वाहनाचा वापर कोणत्याही सबबीवर करून गस्तीवर जावू नये नियमाचे उल्लंघन करू नये त्या पथकात नियुक्त केलेल्या दोन शास्त्रधाऱ्यानां सोबत घेऊन गस्तीवर निघावे असे तीन तक्रारी बाबत जळगाव जिल्हाधिकारी अमन मित्तल यांना बल्लाळेश्वर युवा फाऊंडेशनच्या वतीने तक्रारींचे निवेदन देण्यात आले.
त्यावेळी बल्लाळेश्वर युवा फाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष हरिभाऊ तुकाराम पाटील, तसेच बल्लाळेश्वर युवा फाऊंडेशनचे पाचोरा तालुकाध्यक्ष दीपक नंदकुमार मुळे, तालुका उपाध्यक्ष किरण सुरेंद्र देवरे, ता.सचिव प्रमोद संतोष पाटील, पाचोरा शहराध्यक्ष सुनील प्रभाकर पाटील, सदस्य तेजस पाटील, अमोल देवरे, प्रशांत पाटील, भैय्या पाटील, कपिल आरुण माने ययांच्या सह मोठ्या संख्येने कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते



