नांदगाव तालुक्यातील बोलठाण मधील हिंदू-मुस्लिम ऐक्याची झलक, एकादशीला मुस्लिम बांधवांच्या वतीने कुर्बानी न देण्याचा निर्णय..
झूम मराठी ऑनलाईन न्यूज मीडिया
नादगाव – प्रतिनिधी (मुक्ताराम बागुल) :-आषाढी एकादशी अवघ्या काही दिवसांवर आली आहे. यामुळे विठ्ठल राखमाई दर्शनाची आणि आषाढीची आतुरता सर्वांना लागली आहे. पण यंदाची आषाढी एकादशी वेगळी असणार आहे. बकरिईद आणि आषाढी एकादशीच्या दिवशी आली आहॆ असे असताना हे दोन्ही सण एकाच दिवशी साजरे केले जातील. नांदगाव तालुक्यातील घाट माथ्यावरील पूर्व भागात असलेल्या बोलठाण मधील हिंदू-मुस्लिम ऐक्याची झलक पाहायला मिळत आहे. आषाढी एकादशीला मुस्लिम बांधवांच्या वतीने कुर्बानी न देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.
गेल्या काही दिवसांत महाराष्ट्रात छोट्या-छोट्या कारणांवरून दंगलीच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे राज्यातील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यातील बोलठाण मधील हिंदू मुस्लिम बांधवांनी एकतेचा संदेश देण्याचा निर्धार केला आहे.
यंदा आषाढी एकादशी आणि बकरीईद एकाच दिवशी आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर सामाजिक सलोखा राखण्यासाठी आणि मध्यममार्ग शोधण्यासाठी ही बैठक घेण्यात आली. यावेळी मुस्लिम बांधवांनी बकरीईदच्या दुसऱ्या दिवशी कुर्बानी देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.
या बैठकीचे निमित्ताने ग्रामपंचायतीचे सरपंच वाल्मीक गायकवाड, उपसरपंच रफिक पठाण, विकास अधिकारी भगवानराव जाधव, पत्रकार निलेश दारमा, मुक्ताराम बागुल, इद्रीस मौलाना, जाबीर मौलाना, युनूस सय्यद, मुस्ताक शहा, मुन्ना टेलर, अकलाख सय्यद, सादिक सय्यद तसेच सर्व गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.



