आपल खान्देशमहाराष्ट्र

पाचोऱ्यात आषाढी एकादशीला कुर्बानी देणार नाही, मुस्लिम बांधवांनी बकरीईदला दिला एकतेचा संदेश

झूम मराठी ऑनलाईन न्यूज मीडिया

आषाढी एकादशी अवघ्या काही दिवसांवर आली आहे. यामुळे विठ्ठल राखमाई दर्शनाची आणि आषाढीची आतुरता सर्वांना लागली आहे. पण यंदाची आषाढी एकादशी वेगळी असणार आहे. बकरिईद आणि आषाढी एकादशीच्या दिवशी आली आहॆ असे असताना हे दोन्ही सण एकाच दिवशी साजरे केले जातील. पाचोऱ्यात हिंदू-मुस्लिम ऐक्याची झलक पाहायला मिळत आहे. आषाढी एकादशीला मुस्लिम बांधवांच्या वतीने कुर्बानी न देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.

गेल्या काही दिवसांत महाराष्ट्रात छोट्या-छोट्या कारणांवरून दंगलीच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे राज्यातील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यातील पाचोरा शहरातील मुस्लिम बांधवांनी एकतेचा संदेश देण्याचा निर्धार केला आहे.

पाचोरा येथील आठवडे बाजारातील नुर मशिदे मध्ये पत्रकार परिषदेचे आयोजन करून सदरचा निर्णय घेण्यात आला. यावेळी माजी नगरसेवक रसुल शेख, मतीन बागवान, महमुद चाबीवाले, वहाब बागवान, सय्यद तारीख,नाशीर खान,जाकीर खाटीक, यांचे सह मुस्लिम बांधव उपस्थित होते.

यंदा आषाढी एकादशी आणि बकरीईद एकाच दिवशी आल्या आहेत. या पार्श्‍वभूमीवर सामाजिक सलोखा राखण्यासाठी आणि मध्यममार्ग शोधण्यासाठी ही बैठक घेण्यात आली. यावेळी मुस्लिम बांधवांनी बकरीईदच्या दुसऱ्या दिवशी कुर्बानी देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे