धुळे जिल्हातील मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी, भारत गौरव ही विशेष गाडी धावणार..
दिलीप जय परदेशी
धुळे जिल्हातील मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजेच रेल्वे प्रशासनाने भारत गौरव नावाची धुळे-दादर विशेष रेल्वे गाडी चालविण्याचा निर्णय घेतला आहे. ही गाडी आठवड्यातून तीन दिवस धावणार आहे. त्यामुळे धुळे, चाळीसगाव, नांदगाव भागातील प्रवाशांना मुंबईला जाण्यासाठी व मुंबईहून परत येण्यासाठी हक्काची रेल्वे गाडी मिळणार आहे.
भारत गौरव, ०१०६५ क्रमांकांची डाऊन दादर-धुळे एक्सप्रेस ही दादरहून रविवार, सोमवार आणि शुक्रवार सायंकाळी ४.१५ वाजता सुटेल. धुळे स्थानकावर रात्री ११.३५ वाजता पोहोचेल. तर गाडी क्रमांक ०१०६६ अप धुळे-दादर एक्सप्रेस ही गाडी धुळे येथून सोमवार, मंगळवार व शनिवारी सकाळी ६.३० वाजता सुटेल, तर दादर येथे दुपारी १.१५ वाजता पोहोचेल.
- या स्टेशनावर असेल थांबा?
ही गाडी धुळ्याहून सुटणार व शिरुड, जामधा, चाळीसगाव, नांदगाव, मनमाड, लासलगाव, निफाड, नाशिक रोड, इगतपुरी, कल्याण, या स्टेशनावर थांबेल. त्यामुळे व्यापारी, नागरीकांना मुंबईत व्यापारानिमीत्त तसेच मंत्रालयात जाण्यासाठी ही गाडी सोईची ठरणार आहे. ही एक्सप्रेस आठवडयातून तीन दिवस धावणार असली तरी प्रवाशांचा प्रतिसाद मिळाल्यास ती दैनंदिन सुरू होऊ शकते.
मुंबईकडे जाण्यासाठी चाळीसगाव स्थानकात अनेक लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्या थांबत असल्या, तरी या रेल्वे गाड्या अगोदरच फुल्ल होवून येतात. त्यामुळे चाळीसगाव स्थानकावर प्रवाशांना कसरत करावी लागते. यामुळे धुळ्याहून सुरू होणाऱ्या या नव्या एक्सप्रेसमुळे प्रवास आरामदायी होणार आहे.
आज रेल्वे विभागाच्या वतीने धुळे मुंबई एक्सप्रेस गाडी शनिवार दि.29 तारखेपासून सुरू होणार असून त्याला खासदार उन्मेशदादा पाटील हिरवी झेंडी दाखवणार असल्याचे माहिती देण्यात आली. 20 एप्रिल रोजी ही नविन गाडी सूरू करण्याबाबत रेल्वेने निवेदन प्रसिद्ध केले होते. त्यामुळे ही गाडी कधी सुरु होणार याची उत्सुकता वाढली होती.
आज शनीवारी चाळीसगाव येथे जल्लोषात होणार स्वागत,आज सायंकाळी 7 वाजता भारत गौरव ट्रेनचे खासदारांच्या हस्ते स्वागत
रेल्वे मंत्री नामदार रावसाहेब दानवे पाटील यांच्या हस्ते पुणे येथून पर्यटन विकासासाठी विविध वैशिष्टे असलेली लोकप्रिय ठरलेली भारत गौरव ट्रेन सुरु होणार असून या गाडीला नाशिक मनमाड चाळीसगाव व भुसावळ असे थांबे देण्यात आले असून सायंकाळी सहा वाजता ढोल ताशांच्या गजरात खासदार उन्मेशदादा पाटील यांचे हस्ते गाडीतील प्रवाशांचे स्वागत करण्यात येणार आहे.
सद्यस्थितीत रेल्वे विभागाने नविन योजनाच्या माध्यमातुन रेल्वे स्टेशनच्या विस्तारीकरण, आधुनिकीकरण साठी कंबर कसली आहे.




