आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र

कौतुकास्पद – कल्याण तालुक्यातील उसरघर येथील जि.प. शाळेला आयएसओ मानांकन दर्जा प्राप्त..


झूम मराठी ऑनलाईन न्यूज मीडिया

कल्याण (प्रतिनिधी)- कल्याण तालुक्यातील उसरघर येथील जिल्हा परिषद शाळेला इंटरनॅशनल स्टॅंडर्डस ऑर्गनायझेशन आयएसओ I.S.O. Certified School नामांकन दर्जा प्राप्त झाला असून आयएसओचे समन्वयक सहदेव चव्हाण यांच्या हस्ते मुख्याध्यापक राहुल परदेशी यांच्याकडे प्रमाणपत्र बहाल करण्यात आले. आयएसओ मानांकन मिळविणारी प्राथमिक शिक्षण विभागातील उसरघर ही तालुक्यातील पहिलीच शाळा ठरली आहे.


सध्याच्या जागतीकीकरणाच्या स्पर्धा युगात जिप शाळामंध्ये गुणवत्तेबरोबर व्यवस्थापन अधिक गुणवत्तापूर्ण करण्यावर भर देण्यात आला आहे, अशा परीस्थितीत जिल्हा परिषद शाळा या स्पर्धेत तग धरून राहण्याकरीता प्रयत्न करीत आहेत. अशा परीस्थितीत कल्याण तालुक्यातील दुर्गम भागात शिक्षकांनी स्वयंप्रेरणेने यासाठी प्रयत्न करीत आयएसओसाठी नोंदणी केली. त्या करिता लागणारे सर्व निकष पूर्ण करण्याचे आव्हान असताना सर्वांनी योगदान देत शाळा नकाशावर आणण्याचा केलेला प्रयत्न अधिक कौतुकास्पद आहे. या काळात उसरघरच्या शाळेने कात टाकली आहे.

जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेचे ज्येष्ठ अधिव्याख्याता डॉ. दिनेश चौधरी हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. प्रमुख अतिथी म्हणून शापोआ अधीक्षक सौ. सुनिता मोटघरे ह्या उपस्थित होत्या. सर्वप्रथम फित कापून शाळेचे आवार व उपलब्ध भौतिक सुविधांची पाहणी करण्यात आली. मुख्याध्यापक राहुल परदेशी यांनी शाळेच्या भिंतीवर काढलेल्या नकाशा व चित्रांचे मान्यवरांनी कौतुक केले. समाज सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अविनाश सोनवणे यांनी केले. शाळेला मदत करणारे देणगीदार धोंडू कृष्णा पाटील, जितेंद्र संते, जनार्दन मढवी, गोरख संते, सूरज पाटील, महादेव संते, भरत संते, काळूराम पाटील, सुमित भंडारी, सुनिल संते, विशाल पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक गजानन मोतीराम पाटील, सर्वपक्षीय युवा मोर्चाचे प्रमुख गजानन जयवंत पाटील, माजी सरपंच क्रांती पाटील, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा मीना संते, अखिल भारतीय शिक्षक कला, क्रीडा मंडळाचे अध्यक्ष नटराज मोरे हे उपस्थित होते. काटई गावाचे माजी सरपंच अर्जून पाटील, शिक्षक पतपेढी खजिनदार रघुनाथ ईसामे, संचालक संतोष गाढे यांनी शाळेला भेट देऊन शुभेच्छा दिल्या. ठाणे महापालिकेचे गटप्रमुख राजेंद्र परदेशी, केंद्रप्रमुख लक्ष्मीकांत परदेशी, शिक्षक सुरेश परदेशी, मानसी खंबायत, पतपेढी संचालक प्रशांत घागस, शांताराम घुले यांचेसह शिक्षक व ग्रामस्थ उपस्थित होते.

 

  उसरघर शाळेला मिळालेल्या आयएसओ प्रमाणपत्रामुळे नवीन ऊर्जा प्राप्त झाली आहे. आजच्या स्पर्धेच्या युगात ग्रामीण तसेच शहरी भागातील पालक तसेच विद्यार्थी यांचा कल हा इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडे वाढत असून हे सध्याचे चित्र पाहता मराठी माध्यमाच्या जिल्हा परिषद शाळा स्वतःमध्ये बदल घडवून आणण्यासाठी धडपड करताना दिसून येत आहे त्याचाच एक भाग म्हणून कल्याण तालुक्यातील उसरघर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला आयएसओ नामांकन प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. गटशिक्षणाधिकारी डॉ. सौ. रुपाली खोमणे, शिक्षण विस्तार अधिकारी सौ. विद्या नाईकवाडी, केंद्रप्रमुख हर्षद खंबायत, विषयतज्ञ राम शिरोळे यांच्या मार्गदर्शनाखाली उसरघर शाळेचे मुख्याध्यापक राहुल परदेशी यांच्यासह शाळेतील शिक्षक यांनी शाळेची अंतर्गत तसेच बाह्य गुणवत्ता वाढविण्यासाठी अथक परिश्रम घेतल्यामुळे या कार्याची दखल घेत इंटरनॅशनल स्टॅंडर्ड ऑर्गनायझेशन मुंबई यांच्या वतीने शाळेचे गुणवत्ता विषयक मूल्यमापन केले असता या शाळेने आवश्यक असलेली गुणवत्ता सिद्ध करून दाखवली त्यामुळे शाळेला प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले आहे. आयएसओ सारख्या नामांकित संस्थेकडून जिल्हा परिषद शाळेला नामांकन प्रमाणपत्र प्राप्त झाल्यामुळे जिल्हा परीषदेच्या शाळेकडे पाहण्याचा पालकांचा दृष्टिकोन बदलेल आणि विद्यार्थी शाळेत प्रवेश घेण्यासाठी हमखास प्रेरित होतील अशी प्रतिक्रिया शाळेचे मुख्याध्यापक राहुल‌ परदेशी यांनी दिली आहे. उसरघर जि.प. शाळा ही आयएसओ झालेली कल्याण तालुक्यातील एकमेव शाळा ठरल्याने सर्व स्तरातून शाळेचे कौतुक केले जात आहे.

 

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे