आपल खान्देशमहाराष्ट्रराजकीय

पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीचा निकलात अमोल शिंदे यांच्या पॅनलला जबर धक्का..

शिवसेना ९, महाविकास आघाडी ७ तर भाजची २ संचालकांची आले निवडून.

 पाचोरा ( प्रतिनिधी ) पाचोरा भडगाव कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीचा निकाल अनेक मातब्बर उमेदवारासाठी धक्कादायक ठरला. या निवडणुकीत पाचोरा व भडगाव शहरासह तालुक्याचे लक्ष लागून राहिलेली व सर्वच पक्षासाठी प्रतिष्ठेची ठरलेली कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत मतदार राजांनी अनेकांना घाम फोडलेला आहे. यामध्ये मतदारसंघात आमदार किशोर पाटील पुरस्कृत शिंदे गटाला एकूण ९ जागा, तर महाविकास आघाडीच्या ७ उमेदवार निवडून आले तर भाजप पुरस्कृत अमोल शिंदे यांना या निवडणुकीत जबर धक्का बसला त्यांना फक्त २ जागांवर समाधान मानावे लागले.

स्थानिक आमदार किशोर पाटील आणि भाजपच्या अमोल शिंदे यांच्यात एकमेकां विरोधात, आरोप प्रत्यारोप झाल्याने ही निवडून गाजली, पाचोरा भडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक तीनंही पॅनलच्या नेतृत्वाची प्रतिष्ठा पणाला लागली असताना महाविकास आघाडीच्या ७ जागा निवडून आल्याने राष्ट्रवादीचे माजी आमदार दिलीप वाघ व ठाकरे गटाच्या वैशाली सूर्यवंशी यांची भूमिका महत्वाची ठरत आहॆ.

  • विजयी उमेदवार असे..

गणेश भीमराव पाटील, प्रकाश अमृत पाटील, प्रशांत पवार, मनोज महाजन, विजय कडू पाटील, श्यामकांत पाटील सतीश शिंदे (महिला सोसायटी सर्वसाधारण – ) पूनम प्रशांत पाटील सिंधू पंडित शिंदे ( ओबीसी सोसायटी), उद्धव मराठे (सोसायटी एनटी), लखीचंद पाटील (ग्रामपंचायत सर्वसाधारण) सुनील युवराज पाटील, नीळकंठ पाटील (ग्रामपंचायत आर्थिक दुर्बल), राहुल रामराव पाटील (ग्रामपंचायत एससी), प्रकाश तांबे (व्यापारी मतदारसंघ), मनोज सिसोदिया, राहुल संघवी (हमाल मतदारसंघ) युसुफ पटेल या उमेदवाराचा विजय झाला आहे.

या निवडणुकीत मातब्बर उमेदवार पराभूत झाले. यात एस. एस. पाटील ग्रुपचे संचालक संजय शांताराम पाटील यांच्या पत्नी अर्चना संजय पाटील यांचा पराभव झाला आहे.  निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नामदेव सूर्यवंशी, सहाय्यक निवडणूक अधिकारी राजेंद्र राऊत व हरिदास पाटील यांनी कामकाज पाहिले.

कृषी उत्पन्न बाजार समितीत सभापती शिवसेना-भाजप युतीचाच राहणार असल्याचे आमदार किशोर आप्पा पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.


बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे