Pachora| नळाला नाही पाणी घागर उतानी रे गोपाळा, गेल्या पंधरा दिवसापासून नळ आलेच नाही!
पाचोरा (झूम मराठी) ऐन उन्हाळ्यात पाचोरा शहरातील तलाठी कॉलनी, शाहू नगर, गोविंद नगरी भाग्यलक्ष्मी नगर, नीलम होटल परिसर, भाग्यलक्ष्मी कॉलनी या परिसरात गेल्या पंधरा दिवसापासून नळाला पाणी सोडले नसल्याने नागरिक त्रस्त झाले असून या ढिम प्रशासनाला शिव्यांची लाखोली वाहली जात असून जर दोन दिवसात पाणी नाही आले तर पालिकेवर हंडा मोर्चा निघणार असा पवित्रा परिसरातील महिलांनी घेतला आहॆ.
पिण्याच्या पाण्याची शहरात काही ठिकाणी बोंबाबोंब! पाणी वितरणाचे नियोजन कोलमडले?
कडक उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी सध्या शहराच्या विविध भागातून नागरिकांची ओरड सुरू आहे. पाचोरा पालिका प्रशासनाचे पाणी वितरणाचे नियोजन कोलमडल्याने अनेक भागात पाणी येत नसल्याने नागरिक त्रस्त झाले असून पाचोरा शहरात तलाठी कॉलनी, शाहू नगर, गोविंद नगरी भाग्यलक्ष्मी नगर, नीलम होटल परिसर, भाग्यलक्ष्मी कॉलनी या परिसरात गेल्या पंधरा दिवसापासून नळाला पाणी सोडले नसल्याने महिलांना मोठ्या कसरती कराव्या लागत आहेत, दोन दिवसात पाणी नाही आले तर पालिकेवर हंडा मोर्चा निघणार असा पवित्रा परिसरातील महिलांनी घेतला आहॆ.




