आपल खान्देशकृषीवार्तामहाराष्ट्रराजकीय

Market Committee Election | पाचोरा भडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे तब्बल 98.22 टक्के शांततेत मतदान…


झूम मराठी ऑनलाईन न्यूज मीडिया  @दिलीप जय परदेशी.

पाचोरा कृषी उपन्न बाजार समिती निवडणुकीत सकाळी ८ तर २ या कालावधीत 1731 मतदारांनी मतदान केले. सकाळच्या टप्प्यात मतदान सुरु झाल्यानंतर पहिल्या चार तासात साधारणपणे 51 टक्के मतदान झाले.  बाजार समितीची निवडणूक चुरशीची झाली असून मतदान केंद्रावर मोठी गर्दी झाल्याचे पाहायला मिळत होते. एकूण मतदान 3338 होते त्या पैकी 3278 मतदारांनी हक्क बजावले, मतदान नुसार 98.22 टक्के मतदान झाल्याचे आकडेवारी प्रसिद्ध कारण्यात आल्याने उमेदवारांकडून आनंद व्यक्त होत आहॆ.

सर्वच राजकीय पक्षांनी बाजार समितीच्या निवडणुकीसाठी जोरदार प्रचार केला होता. सर्वच पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या निवडणुकीच्या प्रचाराच्या काळात राजकीय नेत्यांनी ऐकमेकांवर आरोप प्रत्यारोप केल्याचे पाहाला मिळाले. बऱ्याच ठिकाणी महाविकास आघाडी विरुद्ध भाजप आणि शिवसेना शिंदे गट असा समना होत आहे. त्यामुळं चुरशीच्या लढती होत आहेत.

तर 30 एप्रिलला मतमोजणी पार पडणार आहे. त्यामुळं ग्रामीण भागात कोणत्या पक्षाचं वर्चस्व आहे हे आपल्याला 30 एप्रिललाचं समजणार आहे. दरम्यान, या निवडणुकीच्या निमित्तानं राज्यातील दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे