ब्रेकिंग

आज पाचोऱ्यात शिवमहापुराण व महारुद्राभिषेक निमीत्त आज रुद्राक्ष वाटप होणार..


पाचोरा (झूम मराठी) पाचोरा  दि.29 एप्रिल पासून प्रारंभ होत आहे. यानिमित्त पाचोरा येथील कैलादेवी मंदिरामागील कार्यक्रमस्थळी महिलांना विनामुल्य आज दि.27-04-2023 गुरूवार रोजी सायंकाळी 5.30 ते 6.00 वाजेपर्यंत रूद्राक्ष वाटपाचे आयोजन करण्यात आलेले आहे.

भारतातील सुप्रसिद्ध शिव कथाकार पंडित प्रदीप मिश्रा यांचे कृपापात्र शिष्य यांच्या अमृतवाणीतून ‘शिवमहापुराण कथा’ व ‘महारूद्राभिषेक’ पाचोरा शहरातील पांडव कालीन पाताळेश्‍वर मंदिर जिर्णोध्दार समिती आयोजित ग्रिन अ‍ॅपल इव्हेटस् प्रस्तुत पाचोरा पत्रकार बांधव यांच्या सहकार्याने पाचोरा शहरांत भडगाव रोडवरील कैलादेवी मंदिरा शेजारील मैदानात 8 दिवसीय शिव महापुराण कथा व महारूद्राभिषेकाचे दिनांक 29 एप्रिल 2023 ते 06 मे 2023 पर्यंत आयोजन करण्यात आले आहे.

या निमित्ताने आज रुद्राक्ष वाटप मर्यादित असल्याने ज्या माता-भगिनी या कार्यक्रमासाठी सेवा देणार आहे फक्त त्यांनाच रूद्राक्ष देण्यात येणार आहे, प्रथम येऊन नाव नोंदणी करणार्‍यास प्रथम प्राधान्य दिले जाईल व भाविक महिलांनी वेळेवर उपस्थिती द्यावी.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे