देश-विदेशमहाराष्ट्र

जनतेचा निर्णय आम्ही नम्रपणे स्वीकारतो; पाच राज्यातील निकालांवर राहुल गांधींची प्रतिक्रिया

झूम मराठी

देशात पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूकांचे निकाल आज जाहीर होत आहेत. उत्तरप्रदेश, पंजाब, गोवा, उत्तराखंड आणि मणिपूरमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. यामध्ये भाजप मुसंडी मारताना दिसत आहे. भाजपने चार राज्यात तर आम आदमी पार्टीने पंजाबमध्ये बाजी मारली आहे. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारूण पराभव झाला आहे. यासर्व निकालावर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

जनतेचा निर्णय आम्ही नम्रपणे स्वीकारतो. ज्यांना जनादेश मिळाला आहे अशा सर्व विजेत्यांना हार्दिक शुभेच्छा. या निवडणुकीमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत घेतली, त्याबद्दल मी काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांचे आणि स्वयंसेवकांच्या कठोर परिश्रमाचे कौतुक करतो. त्यांच्या परिश्रम आणि समर्पणाबद्दल आभार व्यक्त करतो. आम्ही या निवडणुकीतून शिकू, जरी पराभव झाला असला तरी देखील लोकांच्या हितासाठी काम करत राहू” असं कँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

देशभरात पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे संपूर्ण निकाल हाती येत असतानाच भाजपाने चार राज्यांमध्ये तर आपने पंजाबमध्ये बहुमत मिळवले आहे. पंजाबमध्ये सत्ता असलेल्या काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. गोव्यातही काँग्रेस दुसऱ्या स्थानी आहे. तर उत्तर प्रदेशात भाजपा सर्वाधिक मोठा पक्ष ठरला असून काँग्रेस बसपाच्याही मागे पडला आहे.

या सर्व निकालांनंतर आता खासदार आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी वरील प्रतिक्रिया दिली आहे. पाच राज्यांतील काँग्रेसच्या खराब कामगिरीनंतर राहुल गांधी यांनी ट्विट करून विजेत्यांचे अभिनंदन केले. तसेच जनतेचा निर्णय आम्ही नम्रपणे स्वीकारतो, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. यातून आम्ही शिकू आणि भारतातील लोकांच्या हितासाठी काम करत राहू. दरम्यान, मात्र हा निकाल काँग्रेसला धक्का देणारा आहे अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे