पाच पैकी चार राज्यांमध्ये भाजप एकहाती सत्ता स्थापन करण्याच्या दिशेने… ठिकठिकाणी भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष
एकूणच या निकालानंतर भाजपने करून दाखवले आहे.
झूम मराठी
पाच राज्यांपैकी चार राज्यांमध्ये भाजपाला घवघवीत यश. भाजपला एकहाती सत्ता स्थापन करता येणार आहे. उत्तर प्रदेशमध्ये भाजपाला स्पष्ट असे बहुमत मिळाले आहे. तर गोवा, मणिपूर आणि उत्तराखंडमध्ये देखील भाजपने बाजी मारली आहे. परंतु पंजाब मध्ये मात्र यावेळी संपूर्ण चित्र पालटले आहे. पंजाबमध्ये आम आदमी पक्षाने आपली ताकद दाखवली आहे.
उत्तर प्रदेश मधील लढाई हि सर्वात महत्त्वाची होती. जिथे भाजपने २६५ जागी आघाडी मिळवली आहे. समाजवादी पक्षाने देखील शंभरी पार करत १३३ जागा मिळवल्या. अखिलेश यादव यांना एवढ्याच जागांवर समाधान मानावे लागले आहे. बसपा हे तिसऱ्या स्थानावर आणि काँगेस चौथ्या स्थानावर आली आहे. राहुल गांधी यांचे मोदी सरकारला महागाईवरून निशाणा साधण्याचे सारे प्रयत्न येथे फोल ठरले आहे.
गोव्यामध्येही यंदाच्या वर्षी भाजप सलग दुसऱ्यांदा सत्ता स्थापन करणार आहे. गोव्यात बहुमतासाठी २१ जागा आहेत. भाजप १९ जागांवर आघाडीवर आहे. केवळ दोन जागांची भाजपाला गरज आहे. आणि तीन अपक्ष उमेदवार भाजपाला समर्थन देणार असल्यामुळे गोव्यातील सत्ता स्थापनेवर शिक्कमोर्तब करण्यात आले आहे.
उत्तराखंड येथे ४९ जागांवर भाजपने आघाडी मिळवली आहे. तर काँग्रेस १४ जगणावर आहे. इतर पक्ष ४ जागांवर आघाडीवर आहेत. त्यामुळे भाजपची सत्ता असणार हे निश्चित झाले आहे.
मणिपूर निवडणुकीमध्ये भाजपने आत्तापर्यंत २८ जागांवर विजय मिळवला आहे. तर काँग्रेसने ९ ,एनपीपी 09 आणि इतर 08 अशजागांवर आघाडी मिळवण्यात आली आहे. त्यामुळे मणिपूर मध्येही भाजपाची सरशी आहे.
पंजाबमध्ये आम आदमी पक्षाने विजय प्राप्त केला आहे. काँगेसचे अपयश येथे दिसून आले आहे. काँग्रेसच्या अनेक बड्या नेत्यांचा येथे पराभव झाला आहे. ९२ जागांवर आपने विजय मिळवला आहे.
एकूणच या निकालानंतर भाजपने करून दाखवले आहे. भाजपच्या या विजयाचा जल्लोष अनेक ठिकाणी साजरा केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाच्या जोरदार घोषणा दिल्या जात आहे.



