ब्रेकिंगमहाराष्ट्र

नाशिक औरंगाबाद मार्गावर नांदूर नाक्याजवळ खासगी बसला आग, 10 प्रवाशांचा होरपळून मृत्यू

नाशिक औरंगाबाद मार्गावर नांदूर नाक्याजवळ (मिरची हॉटेल) खासगी बसला लागलेल्या आगीत 10 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला आहे तर 38 प्रवासी जखमी असल्याचे वृत्त आहे.. पहाटे पाच वाजता बस व ट्रेलरमध्ये हा अपघात झाला,सदर बस ही यवतमाळकडून मुंबईकडे जात होती,बसमध्ये 30 ते 40 प्रवासी होते.. चिंतामणी ट्रॅव्हल्सची बस असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.. प्रवासी झोपेत असल्यामुळे लगेचच बसमधून खाली उतरण्यास त्यांना वेळ लागला.या आगीत बस जळून खाक झाली आहे.

नाशिक – औरंगाबाद मार्गावर नांदूरनाका येथे एका खासगी प्रवासी बसला भीषण आग लागल्याने ही दुर्घटना घडली आहे. या भीषण दुर्घटनेत दहा ते अकरा प्रवाशांचा जळून मृत्यू झाला आहे. तर ३८ जण होरपळले आहेत. जखमी झालेल्यांमध्ये अनेकांची प्रकृती गंभीर असल्यामुळे मृतांची संख्या वाढण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. एका ट्रकला धडकल्यानंतर या बसला आग लागल्याची माहिती समोर आली आहे.या अपघातग्रस्त बसमध्ये सुमारे ५० प्रवासी प्रवास करत होते. चिंतामणी ट्रॅव्हल्सची ही स्लीपर कोच बस होती. यवतमाळहून मुंबईच्या दिशेने निघालेल्या या बसचा आणि धुळ्यावरून पुण्याच्या दिशेने जाणारा एक कंटेनर यांच्यात भीषण अपघात झाला. यानंतर बसला आग लागली.

दरम्यान, या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या अपघातात ११ जण ठार तर ३८ जण जखमी झाल्याची माहिती दिली. अपघातातील जखमींना तात्काळ उपचारासाठी दाखल करण्यात आले असून मृतांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रूपयांची मदत देण्याची माहिती देखील मुख्यमंत्र्यांनी याप्रसंगी दिली.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे