आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र

दहावी-बारावीचा निकाल वेळेवर लावण्यासाठी प्रयत्नशील ; शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती

मुंबई :- दहावी, बारावीचा निकाल उशिरा लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. अशातच बोर्डाच्या निकालाबाबत एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. दहावी, बारावीचा निकाल वेळेवर लावण्याचा प्रयत्नशील असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. निकालासंदर्भात पुढच्या आठवड्यात एका बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

 

अहमदनगरमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अधिवेशनात वर्षा गायकवाड बोलत होत्या. शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या की, दहावीची आणि बारावीचे निकाल वेळेवर लावण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. मार्चमध्ये एक बैठकमध्ये झाली आहे. पुढच्या आठवड्यातही एक बैठक होणार आहे. साधारणत: पंधरा दिवसाच्या अंतराने दहावी आणि बारावीचा निकाल लागतात यावर्षी ही निकाल वेळेत लागणार आहेत.

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 10 जूनपूर्वी दहावीचा आणि 15 जूनपूर्वी बारावीचा निकाल लागणं अपेक्षित आहे. मात्र औरंगाबाद विभागी मंडळाच्या उत्तरपत्रिका तपासणी आणि नियमनाचे कामकाज विचारात घेता, निकाल उशिरा लागण्याची भीती अध्यक्षांनी व्यक्त केली आहे. एवढंच नाही तर विनाअनुदानित/स्वयं अर्थसहाय्यीत तत्वावरील शाळांचे शिक्षक संबंधित शाळांचे उत्तरपत्रिका तपासणीच्या कामाला विलंब करत असल्याचं निदर्शनास आलं आहे. ही बाब विचारात घेऊन संबंधित शाळेचे मंडळ मान्यता काढून घेण्यात येईल आणि बोर्डाचा सांकेतिक क्रमांकही गोठवण्यात येईल, असाही इशारा बोर्डाने दिला आहे. त्यामुळे यंदा दहावी, बारावीचा निकाल वेळेवर लावण्याची शक्यता आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे