महाराष्ट्र

‘धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्यांवर कारवाई करणार’; गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचा इशारा!


झूम मराठी वृत्तसेवा

राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडविण्याचा कुणी प्रयत्न केला तर आम्ही पूर्ण तयारीत आहोत. कायदा आणि सुव्यवस्था बिघडणार नाही याची काळजी घेत आहोत. कुठल्याही कृतीमुळे समाजात तेढ निर्माण होणार नाही अशी कृती कुणी करू नये. अशी कृती कुणी केल्यास मग ती संघटना असो वा व्यक्ती असो त्याच्यावर कारवाई होइलच, असा इशारा राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिला.

गृहमंत्र्यांनी पुढे सांगितले कि, राज्यातील सर्व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घ्यावी, अशा सूचना पोलीस महासंचालक यांना देण्यात आल्या आहेत. पोलिसांनी कुठलाही निर्णय घेताना त्याची परिणामकता तपासून घ्यावी. या बैठकीनंतर मुख्यमंत्री यांच्यासोबत बैठक घेऊन मग अंतिम निर्णय घेऊ, असे गृहमंत्री म्हणाले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मस्जिदीवरील भोंगे उतरविण्यासाठी ३ मे पर्यंतची मुदत दिलीय. या मुदतीनंतर राज्यात दंगली होतील का असे गृहमंत्र्यांना विचारले असता ते म्हणाले, महाराष्ट्रात दंगली होतील असे काही वातावरण नाही. मात्र पोलीस परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. देशात काही राज्यात दंगे झाले आहेत. महाराष्ट्रातही तसे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न काही जण करत आहेत. पण, महाराष्ट्रात पोलीस तयारीत आहेत. जे कुणी असा प्रयत्न करत असतील त्यांना जशास तसे उत्तर देऊ. देशासमोर महागाई, सीमा सुरक्षा असे अनेक प्रश्न आहेत. मात्र, त्यावरून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठी अशी अशांतता काही घटक निर्माण करत आहेत. हे घटक कोण आहे ते पोलीस तपासात समोर येईल, असे त्यांनी सांगितले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे