देश-विदेश

वैज्ञानिक हादरलेत; मानवी रक्तात पहिल्यांदाच सापडले मायक्रो प्लॅस्टिक!

प्लॅस्टिकचे प्रदूषण, हा जगापुढे मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण, प्लॅस्टिकचा वापर इतका वाढला आहे की आता माणसांच्या रक्तातही प्लॅस्टिकचे अंश (सूक्ष्म कण) आढळत आहेत. यामुळे वैज्ञानिक हादरले आहेत. (Microplastics first found in blood) कोलेस्ट्रॉल रक्ताची घनता वाढविण्याचे काम करते. यामुळे ‘हार्ट अटॅक’चा धोका असतो. आता मानवी रक्तामध्ये प्लॅस्टिक सापडायला सुरुवात झाली आहे.

वैज्ञानिकांना संशोधनात ८० टक्के लोकांच्या रक्तात ‘मायक्रोप्लॅस्टिक’ सापडले! धक्कादायक म्हणजे हे प्लॅस्टिक रक्तातून एका बाजूहून दुसऱ्या बाजूकडे जाऊ शकते. तसेच एका अंगाला कुठेही जमा होऊ शकते. यामुळे संशोधनात असे लक्षात आले आहे की, या मायक्रोप्लॅस्टिकमुळे मानवी पेशींचे नुकसान केले आहे. प्लॅस्टिकचे कण हवेतूनही नाकावाटे शरीरात जातात. हवा प्रदूषणामुळे दरवर्षी लाखो लोकांचा मृत्यू होतो.

प्लॅस्टिक कचऱ्यामुळे हे अतिसूक्ष्म प्लॅस्टिकचे कणदेखील हवेत मिसळत आहेत. यामुळे हा धोका आणखी वाढला आहे. या संदर्भात उल्लेखनीय आहे की, प्लॅस्टिक बॉटलमधील पाणी पिऊ नका, प्लॅस्टिकच्या डब्यातील पदार्थ खाऊ नका, असे जगभरातील तज्ज्ञ वारंवार बजावत आहेत. तरीही थंड पदार्थांसाठीच नाही तर गरम पदार्थांसाठीदेखील प्लॅस्टिकचा वापर मोठ्या प्रमाणात सुरू आहे. हे मायक्रोप्लॅस्टिक  (प्लॅस्टिकचे प्रदूषण) जगातील सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्ट आणि सर्वांत  खोल समुद्रापर्यंत पोहचले आहे. अन्न, पाणी आणि श्वासाद्वारे मायक्रोप्लॅस्टिक  माणसांच्याही शरीरात जाते आहे.

लहान मुले आणि प्रौढांच्या चेहऱ्यावर हे कण आढळून आले आहेत. प्रयोगात शास्त्रज्ञांनी २२ अज्ञात रक्तदात्यांचे रक्त नमुने तपासले. यात १७ नमुन्यांमध्ये  प्लॅस्टिक  आढळले! यापैकी निम्म्या नमुन्यांमध्ये पेयाच्या बाटल्यांमध्ये वापरण्यात येणारे ‘पीईटी  प्लॅस्टिक ’ आढळले. एक तृतीयांश लोकांमध्ये ‘पॉलिस्टीरिन’ आढळले, याचा वापर अन्न पॅकेजिंग आणि इतर उत्पादनांमध्ये केला जातो. आपल्या रक्तामध्ये ‘पॉलिमेरिक कण’ आहेत हे धोक्याचे संकेत आहेत. हा महत्त्वाचा शोध आहे. शास्त्रज्ञ आता हे संशोधन विस्तारण्याचा विचार करत आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे