आपल खान्देश

चोपड्यात विषारी दूधनिर्मिती कारखाना उध्वस्त

आयजी पथकाच्या छाप्यात 11 लाखाहून अधिक किमतीचे साहित्यासह अडीच हजार लिटर दूध जप्त!

झूम मराठी

जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्याच्या बिडगाव येथे पोलिस उपमहानिरीक्षकांच्या विशेष पथकाने रिफाइंड तेलापासून दूध तयार करणारा कारखाना उध्वस्त केला असून टोळीतील तीन संशयितांना अटक केली. त्यांचा म्होरक्या मात्र पळून जाण्यात यशस्वी ठरला. या टोळीकडून तब्बल ११. १८ लाखांच्या मुद्देमालासह बनावट दूध जप्त करण्यात आले. नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस उपमहानिरिक्षक डॉ. बी. जे. शेखर-पाटील यांच्या विशेष पथकातील वरिष्ठ निरीक्षक बापू रोहम जिल्हा गस्तीवर असताना त्यांना गुप्त बातमीदाराने रसायनापासून दूध निर्माण करणाऱ्या कारखान्याची माहिती दिली.

माहितीची खात्री करण्यासाठी पथकातील सचिन जाधव, रामचंद्र बोरसे, सचिन धारणकर, प्रमोद मंडली. मनोज दुसाने, सुनील दामोदरे, संजय हिरवरकर, कुणाल मराठे, सुरेश टोंगरे, बशीर गुलाब तडवी यांच्या पथकासह अन्नसुरक्षा अधिकारी सुवर्णा महाजन अशांनी ‘सर्च ऑपरेशन’ सुरू केले. बिडगाव (ता.चोपडा) येथील कुंड्यापाणी येथे संभाजी पाटील यांच्या शेतात घातक रसायनांपासून दूध तयार करण्याचा कारखाना चालवला जात असल्याची खात्री झाल्यावर पथकाने मध्यरात्री चहूबाजूने सापळा रचत छापा टाकला. यात झोपडीच्या आडोशाला दोन महिंद्र पिक-अप आढळून आल्या. तेथे तीन व्यक्ती बल्बच्या प्रकाशात दुधाच्या कॅनमध्ये मिक्सरच्या साहाय्याने मिश्रण टाकत असताना आढळून आले.

पथकाने छापा टाकून भिकन अशोक साळुंखे (वय २५, रा. चिंचोली, यावल), हेमंत रतिलाल महाजन (४२, रा. धानोरा, ता. चोपडा), सारा बुटा भरवाड (४०, मूळ रा. लिंबडी, जि. सुननगर, गुजरात. ह. मु. बिडगाव कुड्यापाणी) अशा तिघांसह विनानंबर पिक-अप व्हॅनजवळ उभा हर्षल पंढरीनाथ पाटील (१८, रा. चिंचोली, ता. यावल) या वाहनचालकासह चौघांना ताब्यात घेतले. अन्न व सुरक्षा अधिकारी सुवर्णा महाजन यांच्यासमक्ष ताब्यात घेतलेल्या चौघांची विचारपूस केली असता त्यांनी बनावट दूध तयार करण्याचा अड्डा लक्ष्मण देवा भरवाड (रा. पळासनेर, ता. शिरपूर) याच्या मालकीचा असल्याचे सांगितले. बनावट रसायनयुक्त दूध तयार करण्यासाठी घटनास्थळावर ८५ किलो पामतेल, २० किलो दूध भुकटी मिळून आली.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे