आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र

शाळेची घंटा वाजली ! ; राज्यात आजपासून प्राथमिक आणि माध्यमिक विभागाच्या शाळा सुरु..

झूम मराठी न्यूज नेटवर्क

राज्यातील शाळा आजपासून पुन्हा जोमाने सुरु झाल्या आहेत. उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर आज शाळेची पहिली घंटा वाजली आहे. आजपासून राज्यातील प्राथमिक आणि माध्यमिक विभागाच्या शाळा सुरु झाल्या आहेत. शाळेच्या पहिल्याच दिवशी विध्यार्थांच जंगी स्वागत करण्यात आलं. काही शाळांमध्ये विध्यार्थाना चॉकलेट्स तर काहींना फुल देत त्यांचं स्वागत करण्यात आलं. कोरोनाच्या महामारीनंतर पहिल्यांदाच शाळा वेळेत आणि ऑफलाईन पद्धतीन नेहमीप्रमाणे सुरु झाल्या आहेत. शाळा जरी 13 जून रोजी झाल्या असल्या तरी विद्यार्थ्यांना 15 जून रोजी प्रत्यक्ष शाळेत बोलावलं जावं असं शिक्षण विभागाच्या आदेशात म्हटलं होतं.

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता गेल्या दोन अडीच वर्षांपेक्षा अधिक कालावधीनंतर ऑफलाईन शाळा सुरू करण्यात आली आहे. यापूर्वी सर्व विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून शिक्षण देण्यात येत होतं. कोरोना आणि त्यानंतर लॉकडाऊन यांचा राज्यांतील शाळांवर मोठा परिणाम झाल्याचं पाहायला मिळालं होतं. अनेक ठिकाणी ऑनलाईन वर्ग भरवण्यात आले. पण दुर्गम भागांतील विद्यार्थ्यांना मात्र सोयी-सुविधांच्या अभावामुळे शाळेपासून दूर राहावं लागलं. सध्या राज्यात सर्व निर्बंधांमधून सूट देण्यात आली आहे. अशातच आता राज्यातील शाळा आजपासून सुरु झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

दरम्यान, राज्यातील शाळा कधी सुरु होणार असा प्रश्न विद्यार्थी आणि पालकांसमोर होता. मात्र शिक्षण विभागानं यासंदर्भात माहिती देत शाळा सुरु होण्याची तारीख जाहीर केली. शिक्षण आयुक्तांनी पत्रक काढत विदर्भ वगळता राज्यातील शाळा 13 जूनपासून सुरु होणार असल्याचं सांगितलं आहे. विदर्भात मात्र शाळा 27 जूनपासून सुरू होणार आहेत. तर विद्यार्थ्यांना 15 जून रोजी प्रत्यक्ष शाळेत बोलावलं जावं असं आदेशात म्हटलं होतं

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे