देश-विदेश

कालीचरण महाराजांना महात्मा गांधींबाबत केलेलं अपमानजनक वक्तव्य भोवलं ; कॉंग्रेसकडून एफआयआर दाखल

महात्मा गांधी यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे त्यांच्यावर सर्वत्र टीकेची झोड उठवली जात आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी देखील मोठ्या प्रमाणात केली जात होती

छत्तीसगड मधील रायपुर येथे धर्मसंसद सुरु आहे. या धर्मसंसदेत मुळचे अकोल्याचे‌ असलेल्या कालिचरण बाबाने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल अपमानजनक वक्तव्य केले होते. त्यावरुन ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. परंतु यावेळी त्यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे त्यांच्यावर सर्वत्र टीकेची झोड उठवली जात आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी देखील मोठ्या प्रमाणात केली जात होती. कालीचरण महाराज यांच्यावर एफआयआर दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे. कालिचरण महाराज यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

छत्तीसगढ़ काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मोहन मरकाम यांनी तक्रार दाखल केली आहे. हे प्रकरण रायपूरचे आहे, जिथे धर्म संसदेत महात्मा गांधींबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यावर काँग्रेसने आपला निषेध नोंदवला आहे. प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष मोहन मरकाम यांनी रात्री उशिरा 12 वाजता सिव्हिल लाईन पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. यासोबतच कालीचरण महाराजांविरोधात एफआयआर नोंदवण्यासाठी काँग्रेस नेतेही रात्री उशिरा टिकरा पारा पोलीस ठाण्यात पोहोचले.

दरम्यान, कालीचरण महाराजांचा महात्मा गांधी यांना शिवीगाळ केलेला व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून सर्व स्तराहून संताप केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर केवळ काँग्रेससह अनेक सामाजिक, राजकीय व्यक्तींनी कालीचरण कालीचरण महाराजांविरोधात देशद्रोहाचा खटला दाखल करण्याची मागणी केली आहे

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे