आपल खान्देशराजकीय

पाचोऱ्यात उद्या काँग्रेसचा भव्य कार्यकर्ता मेळावा होणार

तालुक्यात नगर परिषद, पंचायत समिती, जिल्हा परिषद यासह विविध सहकारी संस्थाच्या निवडणूका होणार आहेत त्या निमित्ताने हा मेळावा काँग्रेसला संजीवनी देईल..

पाचोऱ्यात काँग्रेसचा भव्य कार्यकर्ता मेळावा होणार अशी माहिती पाचोरा तालुकाध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी दिली.

पाचोरा (प्रतिनिधी) – येणाऱ्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून संघटन वाढवणे या उद्देशाने पाचोरा कॉंग्रेस ने दि २९ डीसेंबर रोजी भव्य मेळाव्याचे आयोजन केले आहे.

नगर परिषद, पंचायत समिती, जिल्हा परिषद यासह विविध सहकारी संस्था होवु घातल्या असुन या निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर आणि नवनिर्वाचित जिल्हा अध्यक्ष प्रदिपराव पवार यांचा सत्कार या निमित्ताने पाचोरा शहर व तालुक्यात पदाधिकारी सह कार्यकर्ते यांचा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून या मेळाव्याच्या तयारी साठी कॉंग्रेस पदाधिकारी यांची नुकतीच बैठक तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांच्या नेतृत्वाखाली संपन्न झाली

यात शहर अध्यक्ष अॅड अमजद पठाण, युवक काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष अॅड अंबादास गिरी, महीला तालुका अध्यक्षा अॅड मनिषा पवार, जिल्हा सरचिटणीस संगिता नेवे, जिल्हा उपाध्यक्षा कुसुम पाटील, अल्पसंख्यक जिल्हा सचिव इरफान मनियार, अॅड कदीर बागवान, शंकर सोनवणे, शरीफ शेख, प्रदीप चौधरी, कल्पेश येवले, सचिन पाटील, रवी सुरवाडे, संजय सोनार आदी उपस्थित होते. दि. २९ डीसेंबर रोजी दुपारी १ वाजता शहरातील भडगाव रोडवरील पाटीलदैवयोग मंगल कार्यालयात आयोजन केले आहे. मेळाव्याचे अध्यक्ष कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष प्रदिपराव पवार आहेत प्रमुख पाहुणे म्हणून जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्याला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी, शहर अध्यक्ष अॅड अमजद पठाण यांनी केले आहे

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे