महाराष्ट्र

पोस्को कंपनी कोरियन अधिकारी यांनी कामगारांना सूड भावनेने कंपनी प्रशासनाने तडका फडकी केले निलंबित!

राहुल महाडिक

माणगाव (प्रतिनिधी ) दि 15.माणगाव MIDC येथील पोस्को महाराष्ट्र स्टील मधील ई. जी. टेक कंपनी मध्ये कामगारांना शिवीगाळ करण्यात आली, त्यावेळी तेथील कोरियन अधिकारी यांनी कामगारांना इंडियन सिख्या आस संबोधलं(सिख्या म्हणजे कोरियन भाषेत कुत्रा),त्या ठिकाणाचे कामगार रुपेश जाधव व निकुल पोळेकर यांना मॅनेजमेंट अधिकाऱ्यांनी जातीवाचक बोलून अपमानित केले, या वेळी कामगारांनी माणगाव पोलीस स्टेशन येथे कंपनी व्यवस्थापणे विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पोलीस प्रशासनाने आरोपीना अटक करून कारवाई केली आहे. परंतु काही दिवसातच आरोपी जामीन मिळवून बाहेर आले असून  अट्रोसिटी प्रकरणात साक्ष देणाऱ्या कामगारांना सूड भावनेने कंपनी प्रशासनाने तडका फडकी निलंबित केले आहे  व गुन्ह्याचा तपास माणगाव पोलीस स्टेशन येथून रोहा येथे वर्ग करण्यात आला आहे.

या वेळी कामगार नेते रमेश जाधव साहेब यांनी आपलं मत मांडताना सांगितले कि कामगार हे दिवसभर आपल्या मेहनतीने रक्त आठवून काम करीत असतात ते कामगार आपल्या अधिकाराच्या, हक्काच्या मागण्या मागत असतील तर कंपनी प्रशासन फक्त त्यांच्यावरती दबाव टाकून त्यांना मानसिक त्रास देत असतात हे या मधून स्पष्ट होत आहे,ही कंपनी कोरियन असून कामगारांवरती अन्याय करीत आहे, ज्या कामगारांवरती कंपनी प्रशासन दबाव टाकत होती अपशब्द वापरत होती त्यांच्याविरुद्ध आवाज उठवीला तर त्यांनी कामगारांना घरी बसविले, हे कंपनी प्रशासन अधिकारी कोरिया मधून पोट भरण्यासाठी आपल्या देशात आलेत आणि आमच्याच कामगारांना इंडियन कुत्रा बोलत आहेत आणि अपशब्द वापरीत आहेत ही कामगारांवरती दडपशाही आहे ती आम्ही सहन करणार नाहीत, वरील तपास माणगाव पोलीस प्रशासनाकडे वर्ग करावा तसेच कंपनी प्रशासनाने जे आरोपी आहेत त्यांच्यावरती कडक कार्यवाई करून सस्पेन लेटर देऊन ज्या ११ कामगारांनवरती अन्याय केला आहे, मानसिक त्रास दिला आहे त्यांची त्वरित कामावरती रुजू करावे, कंपनीमधील सर्व कामगारांना कायमस्वरूपी करण्यात यावे यासाठी आम्ही लवकरच सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेबांना भेटणार आहोत,तसेच कोणत्याही कामगारांने कंपनीच्या दबावाला बळी न पडता आपल्या हक्काच्या मागणीसाठी रिपब्लिकन सेनेचे कामगार नेते रमेश जाधव साहेब यांच्या सोबत यावे असे झूम मराठी चे रायगड जिल्हा प्रतिनिधी यांच्याशी बोलताना सांगितले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे