पाचोरा – जारगाव चौफुली वरील अवैद्य धंदे व वाढती गुंडगीरी बंद करा- किशोर डोंगरे
जारगाव चौफुली वरील अवैद्य धंदे व वाढती गुंडगीरी बंद करा निवेदन देतांना
पाचोरा शहरातील मध्यवर्ती चौक असलेली व शहरातील केंद्र बिंदू ठरलेली जारगाव चौफुली येथे सर्ह्यास पद्धतीने, देशी विदेशी गावठी दारु,सट्टा,मटका पत्ता,व हप्त्याची सावकारी आजून बरेच काही अवैद्य धंदे सुरु आसून या ठिकाणी गावगुंडाचे प्रमाण वाढल्यामुळे ,व या गुंडाच्या बेकायदेशीर धंद्यामुळे रहदारीस कोंडी निर्माण होऊन जीव घेणी व डोके दुखी ठरत आहे.परिसरातील महिला,विद्यार्थी महाविद्यालयीन युवती,युवक व प्रवासी बंधू याचे वावरणे कठीण आसून सर्व सामान्य जनतेमध्ये दहशतीचे व भितीचे वातावर निर्माण झाले आहे.
या बाबत सविस्तर माहिती असे कि दिनांक १३/१२/२०२१ रोजी रात्री ९:३०च्या दरम्यान आंबेडकरी चळवळीचे जेष्ठ नेते व सामाजिक कार्याकर्ता किशोर डोंगरे हे घरी(जांरगाव) जात आसताना एक समाज कंटक गावगुंडाने दारुच्या नशेत एक कुठलेही कारण नसताना धिंगाना घालत जातीय व्देष बाळगून जातीवादक शिवीगाळ करत झटापटी करण्याचा पर्यंन्त केला. व त्यांच्या सोबत आसलेल्या कार्यकर्ताशी हतापाई करुन शस्राचा धाक दाखवत जिवे ठार मारण्याची धमकी देत पसार झाला.या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आसुन .या घटनेचा सर्व सामाजिक स्थारातून निषेध होत आसून, हि घटना चळवळीतील व्यक्ती बरोबर घडल्यामुळे संबंधित ह्या गुन्हेगाराला व गुन्हेगारीला अाळा घालावा. शहरातील कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी. म्हणून ह्या बेकायदेशीर धंद्या संदर्भात सर्व स्तरावर निवेदन दिले जात आसून हे बेकायदेशी उद्योग बंद करावे,अशी मागणी ग्रामस्थान कडून केली जात आहे.म्हणून सदर घटने बाबत अत्ता पोलिस प्रशासन , ग्रमापंचायत ,महसूल विभाग व राज्य उत्पादक शुल्क विभाग(दारु बंदी विभाग) काय भूमिका घेईल याकडे लक्ष असून या घटने बद्दल. काय कारवाई होते?? व कारवाई न झाल्यास!!! यांना कोणाचे पाठबळ मिळते?? जर पाठबळ मिळाले तर मात्र या विरोधात जनआंदोलन घडवून आणल्या शिवाय पर्याय नाही!! असे त्यांनी संगितले.


