अरुण फत्तु परदेशी हया धनगर पुत्राची आरोग्य विभागाच्या पतसंस्थेत अध्यक्ष पदी बिनविरोध निवड
अरुण फत्तु परदेशी हया धनगर पुत्राची आरोग्य विभागाच्या पतसंस्थेत अध्यक्ष पदी बिनविरोध निवड
अरुण फत्तु परदेशी, धुळे जिल्ह्यातील कुसुंबा गावाचे सुपुत्र ह.मु. डोंबिवली यांची त्यांच्या आरोग्य विभागाच्या हिवताप निर्मुलन कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित ठाणे/पालघर यांच्या अध्यक्ष पदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचे मुरलीधर परदेशी (सामाजिक कार्यकर्ता) आणि इतर सर्व धनगर समाज बाधवांतर्फे अभिनंदन करण्यात आले येत आहे.
अरुण भाऊंबाबत सांगायचे म्हटले तर ते धुळे जिल्ह्यातील कुसुंबा गावाचे सुपुत्र आहेत. त्यांची कर्मभूमी मुंबई असुन ते आरोग्य विभागात आपली सेवा बजावतात. त्यांच्या ठाणे जिल्हा पालघर जिल्ह्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांची पतसंस्थेत ते पुर्वी सचिव म्हणून काम पहात होते. त्याचे काम आणि सगळ्यांशी जिव्हाळे संबध असल्यामुळे त्याच पतसंस्थेवर त्यांची बिनविरोध अध्यक्ष पदी निवड झाली आहे. पद म्हटलं म्हणजे राजकारण आलंच ! आणि राजकारण आलं म्हणजे अर्थिक उधळण आलीच. पदाचा लोभा पोटी किंवा पद मिळवण्यासाठी आपल्या जवळचे लोक सुद्धा वैरी होतात. आणि आपसात स्पर्धा चालू होते. हया सगळ्या गोष्टींपासून आपला मल्हार सैनिक अलिप्त होता. तरी देखील त्यांची त्यांच्या पतसंस्थेवर सर्वांमते बिनविरोध निवड झाली आहे.



हया निवडी मागिल खरं रहस्य म्हणजेच त्यांच्या निस्वार्थ स्वभाव, अभ्यासू वृत्ती, सगळीकडे सक्रीय सहभाग आणि सगळ्यांशी बोलतांना मोजक बोलून मान सन्मान देण हे त्यांच्या स्वभावात दिसून येतं! आणि ह्याच सकारात्मक गोष्टी त्यांना आपोआप प्रगतीचा दिशेकडे नेत आहे.
यापूर्वी अरुण भाऊंवर मुंबईत वास्तव असलेल्या धनगर समाज बांधवांच्या धनगर समाज उन्नती मंडळ ठाणे/मुंबई. (रजि.) हया मंडळाची देखील अध्यक्ष पदाची जबाबदारी टाकली आहे. थोडक्यात आता त्यांच्यावर जनसेवेची जबाबदारी वाढली आहे. मुरलीधर परदेशी यांनी त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.




