पाचोरा – निर्मल इंटरनॅशनल स्कूलमध्ये विदयार्थ्याचे जल्लोषात स्वागत !
पाचोरा : निर्मल इंटरनॅशनल स्कूलमध्ये आज प्राथमिक विभागाचे वर्ग सुरू करण्यात आले आज विदयार्थ्यांचा पहिलाच दिवस असल्यामुळे विदयार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. शाळेच्या प्रांगणात विदयार्थ्याच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली होती. रंगेबीरंगी फुग्यांची कमान तयार करून शाळेच्या मुख्य दरवाज्यावळ लावण्यात आलेली होती. वर्ग खोल्या फुग्यांनी सजवल्या होत्या.

विदयार्थी व शालेय कर्मचा-यांचे थर्मल स्कीनींग, ऑक्सिमीटर तपासणी करून सामाजिक अंतराचे पालन करण्यात आले. शालेय प्रशासनातर्फे शाळेच्या संपूर्ण वर्गखोल्यांचे निर्जंतुकीकरण करण्यात आले होते.
याप्रसंगी शाळेच्या अध्यक्षा सौ. वैशाली सुर्यवंशी, सचिव श्री. नरेंद्रसिंग सुर्यवंशी प्राचार्य श्री गणेश राजपूत, उपप्राचार्य श्री. प्रदिप सोनवणे प्रशासकीय अधिकारी श्री. संतोष पाटील तसेच शाळेतील सर्व शिक्षकांनी विदयार्थ्याचे स्वागत केले. विदयार्थी, शिक्षक आणि पालक यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण पसरले होते.




