महाराष्ट्र

महाराष्ट्रात उडणार बैलगाडा शर्यतींचा धुरळा; सुप्रीम कोर्टची सशर्त परवानगी

 अनेक वर्षांपासून महाराष्ट्रभर चर्चेत असणाऱ्या बैलगाडा शर्यतीवरील बंदीविषयी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. अखेर न्यायालयाने महाराष्ट्रात बैलगाडा शर्यतीला सशर्त परवानगी दिली आहे. यापूर्वी मुंबई उच्च शर्यतीवर बंदी कायम ठेवली होती. मात्र, आता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर बैलगाडा मालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे राज्यात आता बैलगाडा शर्यतीचा मार्ग मोकळा झाला आहे. आता राज्यात बैलगाडा शर्यतीचा धुरळा उडणार आहे. न्यायालयाच्या निकालामुळे राज्यातील बैलगाडा शर्यतीचा मार्ग मोकळा झाला आहे. चार वर्षांपूर्वी न्यायालयाने बैलगाडा शर्यतींवर बंदी घातली होती. मात्र, ही बंदी आता उठवण्यात आली आहे. या निर्णयाचे राज्यभरातून स्वागत होत आहे. मात्र, या शर्यतींमध्ये पशू क्रूरती प्रतिबंधक कायद्यांतर्गत नियमांचे पालन करणे बंधनकारक असेल.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे