आरोग्य व शिक्षण
वृंदावन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल पाचोरा माध्यमातून जरंडी येथे महाआरोग्य शिबीर
वृंदावन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल पाचोरा माध्यमातून जरंडी येथे महाआरोग्य शिबीर
पाचोरा : प्रतिनिधी, वृंदावन हॉस्पिटल मल्टी स्पेशालिटी सेंटर पाचोरा माध्यमातून जरंडी सरपंच सदस्य ग्राम पंचायत मंडळ यांनी महाआरोग्य शिबिर घेतले यात वृंदावन हॉस्पिटल संचालक डॉ. निळकंठ पाटील अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. प्रफुल्ल कबरा एम. डी. जनरल फिजिशियन, डॉ. चेतन राजपूत बालरोग तज्ञ उपस्थित होते, तसेच सर्व प्रकारच्या आरोग्य आणि रक्त तपासण्या घेण्यात आल्या.
शिबिर पूर्व संध्येला भव्य कीर्तन ह. भ. प. संदीप महाराज वाघळी कर यांचे कीर्तन बालाजी मंदिर येथे संपन्न झाले. यात कोरोना योद्धा आशा वर्कर यांचा डॉ. निळकंठ पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमसाठीचे सरपंच, ग्रामपंचायत गावातील तरुण यांनी अनमोल परिश्रम घेतले.



