ताडोबाच्या ‘माया’ वाघीनीने हिरावली चार वर्षाची आरुषीची माया
,माये विना निरागस आरूषी कडे बघुन सर्वत्र हळहळ व्यक्त केल्या जात आहे.
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाची शान माया वाघीन जिला पाहायला देश विदेशातील पर्यटक आकर्षीक होऊन मायाच्या दर्शनाने कृतार्थ होतात. मात्र याच मायाच्या मायावी हल्यात महिला वन कर्मचारी स्वाती नानाजी ढुमणे वय ३१ वर्ष २० नोहेम्बरच्या सकाळी ८.३० च्या दरम्यान शहिद झाल्या. ज्यामुळे स्वातीची चार वर्षाची मुलगी आरूषीची माया हिरावल्या गेली. माये विना निरागस आरूषी कडे बघुन सर्वत्र हळहळ व्यक्त केल्या जात आहे.
डिसेंबर महिन्यात स्वाती ढुमणे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातिल कोलारा कोअर वन परीक्षेत्रात वन रक्षक म्हणुन बदलुन आल्या. २० नोहेम्बंर पासुन सुरु होणाऱ्या राष्ट्रिय वाघ सर्वेक्षण २०२२ अंतर्गत वाघाचे चिन्ह सर्वेक्षण(ट्रॉन्झिट लाईन सर्वे) तथा पायी चालण्याचा व्यायाम या करीता पहाटे ५.३० वाजता मुलगी आरूषीचा निरोप घेऊन पतीसह कोलारा गेट येथे ६.०० वाजता हजर झाल्या. माया वाघीनच्या क्षेत्रात जात असुन कधी पर्यंत येईन हे सांगता येणार नाही असे म्हणुन कोलार गेटवर सहकाऱ्यानिशी पतीला फोटो काढायला सांगीतले. हा फोटो पति संदिप सोनकांबळे यांच्या मोबाईल मध्ये अखेरचा फोटो ठरला. कारण अवघ्या दोन तासातच कोलारा गेट पासुन ४ किलोमिटर अंतरावर असलेल्या वाघाई चौरस्त्या जवळील कक्ष क्रमांक ९७ मध्ये माया वाघीनने झडप टाकली आणी ठार करूण फरफटत नेले
उप जिल्हा रुग्णालय येथे आणल्या नंतर व प्रेतास भडांग्नी देई पर्यंत लहानग्या आरूषीला उपस्थीतांच्या चर्चेतुन आणी चाललेल्या धावपळीतुन आईला वाघीनीने खाल्याचे समजले. तरीही आई सांयकाळी ड्युटी वरून घरी येणार असल्याचेच आरूषी सांगत होती. वन विभागा कडून वडीलास मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत तथा नौकरी सुद्धा मिळेल. मात्र आरूषीच्या डोक्यावरील मायेचा पदर गेला तो परत मिळणार नाही. पैशाने आईची माया भेटणार नाही. स्वाती ढुमणे यांनी दोन एटीएस कर्मचाऱ्यांची मागणी वन अधिकाऱ्यांकडे केली होती. ही मागणी धुडकावून लावण्यात आल्याचे स्वाती यांचे पती संदीप सोनकांबळे यांनी सांगुण एटीएसचे प्रशिक्षित कर्मचारी सोबत असते, तर ही घटना घडली नसती. त्यामूळे या घटनेला सर्वस्वी वनाधिकारी जबाबदार असल्याचा आरोप केला आहे.
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील प्रथम वन शहिद स्वाती दुमने यांच्या शवविच्छेदनानंतर वनपरिक्षेत्र कार्यालय चिमूर येथील परीसरात दर्शना करीता ठेवण्यात आले. वन विभागा तर्फे स्वाती यांना मानवंदना देण्यात आली. आणी सायंकाळी ५ वाजता चिमूर येथील स्मशानभूमीत शासकीय इतमामात पती संदीप सोनकांबळे यांच्या हस्ते भडाग्नी देऊन अंतिम संस्कार करण्यात आले. यावेळेस ताडोबाचे कोअर संचालक जितेंद्र रामगावकर, उपसंचालक नंदकिशोर काळे, उपसंचालक (बफर) गुरुप्रसाद, वनसंरक्षक (कोअर) महेश खोरे, सहायक वनसंरक्षक अभिजित वायकोस, डि एफ ओ भागवत, वनपरिक्षेत्र अधिकारी सतीश शेंडे, किरण धानकुटे, रमेश ठेमस्कर, क्रिष्णापुरकर, नैताम ट्री फाउंडेशनचे मनीष नाईक, स्वातीच्यां जवळचे नातेवाईक उपस्थित होते.



