आपल खान्देश

निराधार परिवारास दीपावलीच्या निमित्ताने श्री स्वामी समर्थ बहुउद्देशीय संस्थेमार्फत मदत

निराधार परिवारास दीपावलीच्या निमित्ताने श्री स्वामी समर्थ बहुउद्देशीय संस्थेमार्फत मदत

नांदगाव ( प्रतिनिधी ) – मुक्ताराम बागुल – नांदगाव तालुक्यातील कांदा शहरातील आधार परिवाराला स्वामी समर्थ मोदीचे संस्था व परकीय सरस्वती चरण धामणे महिला बहुउद्देशीय संस्था यांच्या वतीने दीपावलीच्या निमित्ताने मदत करण्यात आली.

स्वराज्य शिवा काशी यांनी स्वतःचे बलिदान देऊन श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना वाचविले. आज रयत आदराने बोलते की, शिवा काशी अमर है. 

असाच एक प्रकार नांदगाव येथील नवीन तहसील कार्यालयाच्या मागे किशोर मधुकर चव्हाण चालत असताना त्याच्यासमोर एक व्यक्ती पाण्यात बुडत असताना दिसला. त्या व्यक्तीस वाचविण्यात यश आले परंतु स्वतःचा प्राण गमवावा लागला. अशा वीराच्या धर्मपत्नी ललिता चव्हाण यांच्या परिवारास दीपावलीच्या निमित्ताने भेट म्हणून धान्य, साडी चोळी, कपडे, मिठाई व काही रोख रक्कम देण्यात आली.

यावेळी महिला बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा अनिता धामणे, प्रतिष्ठित व्यापारी श्याम पारक, महिला बहुउद्देशीय संस्था चे उपाध्यक्ष सुनिता पारक, कामगार युनियन सेना अध्यक्ष वामन पोतदार, मंत्रालयातील अमोल पारखे, ज्येष्ठ नागरिक संघाचे माजी अध्यक्ष रंगनाथ चव्हाण, रमाकांत सोनवणे, जटा चॅनलचे धनंजय गोजरेकर, सोमनाथ जोशी, व संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे