देश-विदेश

छोटा राजन जिंदा है!!

तिहार तुरुंगात शिक्षा भोगत असलेला कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनचा करोनामुळे मृत्यू झाल्याची बातमी काही प्रसारमाध्यमांनी दिली आहे. मात्र एएनआय या वृत्तसंस्थेने छोटा राजन हा जिवंत असल्याचं म्हटलं आहे. नवी दिल्लीमधील ऑल इंडिया इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सर्व्हिसेस म्हणजेच एम्समध्ये उपचारादरम्यान राजनवर उपचार सुरु आहेत. शुक्रवारी राजनाचा मृत्यू झाल्याची बातमी काही प्रसारमाध्यमांनी दिली होती. मात्र काही वेळातच एएनआयने एम्समधील सुत्रांच्या हवाल्याने राजन जिवंत असल्याचं म्हटलं आहे.

तिहारच्या तुरुंगामध्येच राजनला एप्रिलच्या शेवटच्या आठवड्या करोनाची लागण झाली. त्याच्यावर सुरुवातीला तुरुंगातील रुग्णालयात उपचार करण्यात आले होते. त्याची प्रकृती स्थिर असं आधी तुरुंग प्रशासनाकडून सांगण्यात आलं होतं. मात्र लक्षणं दिसल्यानंतर छोटा राजनची करोना चाचणी करण्यात आली आणि तो पॉझिटिव्ह आढळून आला. यासंदर्भातील माहिती तुरुंग प्रशासनाकडून देण्यात आली होती. राजन पॉझिटिव्ह आल्यानंतर तिथे तैनात असलेल्या सुरक्षारक्षकांना होम क्वारंटाइन होण्यास सांगण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान राजनची प्रकृती खालावल्याने त्याला एम्समध्ये दाखल करण्यात आलं आहे. २६ एप्रिलपासून राजनवर एम्समध्ये उपचार सुरु आहेत

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे