आपल खान्देशराजकीय

मुक्ताईनगरमध्ये भाजपला आणखी एक धक्का, आजी-माजी 10 नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश

जळगाव | ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर जळगाव भाजपला बसणारी धक्क्याची मालिका सुरुच आहे. मुक्ताईनगरमध्ये शिवसेनेनं पुन्हा एकदा भाजपला जोरदार धक्का दिला आहे. मुक्ताईनगरमधील भाजपच्या 7 विद्यमान आणि 3 माजी नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवे केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत या 10 आजी-माजी नगरसेवकांनी हाती शिवबंधन बांधलं आहे.

कॅबिनेट मंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला आहे. या नगरसेवकांमध्ये मुक्ताईनगरमधील पियुष महाजन, संतोष कोळी, मुकेश वानखेडे आणि अन्य 4 जणांचा समावेश आहे.

नगरसेवकांच्या शिवसेना प्रवेशामुळे जळगाव भाजपला आणि गिरीश महाजन यांना हा दुसरा मोठा धक्का मानला जात आहे. एकेकाळी राज्यातील भाजपचे सर्वात मोठे नेते आणि विरोधी पक्षनेते राहिलेले एकनाथ खडसे गेल्या काही वर्षांपासून भाजपमध्ये अडगळीत पडले होते. अखेर त्यांनी भाजपला रामराम ठोकला आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर जळगाव जिल्ह्यातील शिवसेनेच्या नेत्यांना सोबत घेत खडसे यांनी भाजपला एकामागे एक धक्के देण्याची साखळी सुरुच ठेवल्याचं पाहायला मिळत आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे