देश-विदेश

जगात सर्वात आधी करोनाची लस घेणाऱ्या विल्यम शेक्सपिअर यांचा मृत्यू

करोनाची पहिली लस घेणारी व्यक्ती म्हणून त्यांची प्रसारमाध्यमांनी दखल घेतली होती. त्यांनी मागील अनेक दशकांमध्ये केलेल्या कामासाठी ते कायम लक्षात राहतील,”

करोनाची सर्वात पहिली लस घेणाऱ्यांपैकी असणाऱ्या विल्यम शेक्सपिअर नावाच्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. ८१ वर्षांच्या शेक्सपिअर यांना ८ डिसेंबर रोजी फायझर-बायोएनटेकच्या लसीचा पहिला डोस देण्यात आला होता. इंग्लंडमधील युनिव्हर्सिटी हॉस्पीटल कॉनव्हेंट्रीमध्ये मार्गारेट केनान या ९० वर्षीय आजींबरोबरच शेक्सपिअर यांनाही लसीचा डोस देण्यात आलेला. क्लिनिकल ट्रायलदरम्यान या दोघांनाही लसीचे डोस देण्यात आले होते.

ज्या युनिव्हर्सिटी हॉस्पीटल कॉनव्हेंट्रीमध्ये शेक्सपिअर यांनी वयाच्या ८१ व्या वर्षी करोनाची लस घेतली त्याच रुग्णालयामध्ये त्यांचा मृत्यू झाला. शेक्सपिअर हे रोल्स रॉयस कंपनीचे माजी कर्मचारी होते. त्यांच्या मृत्यूसंदर्भातील बातमी डेली मेल या वृत्तपत्राने दिलीय. जेनी इनिस या शेक्सपिअरच्या मित्राने फेसबुकवर “अनेक गोष्टींसाठी तो कायम आठवणीत राहील. त्यामध्ये लस घेण्याचाही समावेश आहे. त्याला श्रद्धांजली वाहण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे स्वत:चं लसीकरण करुन घेणं,” असा मजकूर पोस्ट केलाय.  शेक्सपिअर यांचा मृत्यू करोनामुळे झाला नसून आधीपासून असणाऱ्या आजारामुळे झाल्याचं सांगण्यात आलं आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे