संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील हुतात्म्यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अभिवादन
संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील हुतात्म्यांना
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अभिवादन
मुंबई, दि. 21 : महाराष्ट्र राज्य हुतात्मा स्मृतिदिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील हुतात्म्यांना अभिवादन केले.
संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील सर्व हुतात्म्यांच्या असीम त्याग, समर्पणातून आधुनिक महाराष्ट्र उभा राहिला आहे, भाषिक स्वातंत्र्य आणि मराठी अस्मिता जागृत ठेवण्यासाठी या महाराष्ट्र सुपुत्रांनी प्राणपणाने दिलेला लढा अभूतपूर्वच राहिला आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हुतात्मा वीरांबद्दत कृतज्ञता व्यक्त केली.
या हुतात्म्यांनी दिलेला लढा अजूनही संपलेला नाही. जग आणि पुढच्या पिढीपर्यंत या सीमा लढ्याच्या संघर्षाची धग पोहोचविणे, तिची धार कायम ठेवणे हेच या वीर महाराष्ट्रपुत्रांना खरे अभिवादन आहे. त्यासाठी मराठीची वज्रमूठ करूया, असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.



