महाराष्ट्र

एसटी कर्मचाऱ्यांनी २४ तासांत कामावर हजर रहा अन्यथा…. ; एसटी महामंडळाची कर्मचाऱ्यांना नोटीस

राज्यात गेल्या काही दिवसांपासून राज्यातील एसटी कर्मचारी आंदोलन करत आहेत. राज्य परिवहन महामंडळाचा राज्य शासनामध्ये सहभाग करून घ्यावा ही मागणी घेऊन कर्मचारी वेगवेळ्या पद्धतीने आंदोलन करत आहेत. आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांची मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन सुरु केले आहे. एसटी कर्मचारी संप मागे घेत नसल्याने एसटी महामंडळाने कर्मचाऱ्यांना नोटीस बजावली आहे.

गेल्या दोन आठवड्यापासून राज्यभरात एसटी कर्मचाऱ्यांचे विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरु आहे. न्यायालयाने आदेश देऊनही एसटी कर्मचारी हे आंदोलन मागे घेण्यास तयार नाहीत. अशातच एसटी कर्मचाऱ्यांचा संप मोडीत काढण्यासाठी एसटी महामंडळ पुढे सरसावले आहे. महामंडळाने रोजंदारीवर काम करणाऱ्या तीनशे ते साडे तीनशे कामगारांना एसटी महामंडळाने सेवा समाप्तीची कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या नोटीसमध्ये एसटी कामगारांना २४ तासांच कामावर हजर व्हा अन्यथा, कोणतीही पूर्वसूचना न देता सेवा समाप्त करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान मंगळवारी जवळपास साडेसात हजार एसटी कर्मचारी कामावर पुन्हा हजर झालेत. यामुळे सायंकाळी सहापर्यंत ६६ बसेस राज्याच्या विविध भागांत सोडण्यात आल्या. यातून जवळपास २००० हजार प्रवाशांनी प्रवास केला.

एसटी महामंडळाचे राज्य शासनामध्ये विलनीकरण, वेतन आणि इतर काही मागण्यांसाठी ऑक्टोबरच्या शेवट्या आठवड्यापासून एसटी कर्मचारी संपावर गेले आहेत. अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या संपाचा फटका सामान्य नागरिकांसह एसटी महामंडळालाही सहन करावा लागतोय. अशातच महामंडळाने कर्मचाऱ्यांना संरक्षण देण्याचे जाहीर केले. यावेळी ७,६२३ कर्मचारी कामावर पुन्हा रुजू झालेत. मात्र रोजंदारीवर काम करणाऱ्या संपकरी कर्मचाऱ्यांना आता महामंडळाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. एसटी महामंडळात रोजंदारी स्वरूपातील दिवस भरला तर पगार, अशा तात्पुरत्या स्वरूपाच्या नेमणूकीचे सुमारे दोन हजार कामगार आहेत. त्यांना महामंडळाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे