आरोग्य व शिक्षणगुन्हेगारी

डमी कोरोना रुग्णांचे रॅकेट? दहा हजार रुपयांसाठी मेल्ट्रॉनमध्ये दोघांची भरती?

आपण कोव्हिड रुग्णालयात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या नावाने भरती झालो आहोत, हे कळल्यावर दोन्ही डमी रुग्णांचा गोंधळ उडाला. त्यांनी डिस्चार्ज करण्यासाठी तगादा लावला. त्यामुळे मेल्ट्रॉनच्या डॉ. वैशाली मुदगडकर यांना शंका आली. त्यांनी अधिक चौकशी केली असचा सर्व प्रकार समोर आला

औरंगाबादः महापालिकेच्या मेल्ट्रॉन या कोव्हिड रुग्णालयात कोरोना बाधित म्हणून दाखल झालेले दोन रुग्ण बोगस असल्याची धक्कादायक माहिती मंगळवारी उघडकीस आली. विशेष म्हणजे दहा हजार रुपयांसाठी या दोन रुग्णांनी हा बनाव केल्याचे पोलिसांच्या चौकशीत समोर आले. पालिकेने या प्रकरणात दोन दलालल, दोन बोगस रुग्ण आणि पॉझिटिव्ह आलेले दोघे अशा सहा जणांविरोधात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनीही गुन्हा नोंदवून दोन डमी रुग्णांना ताब्यात घेतले असून या रॅकेटचा शोध सुरु आहे.

सिद्धार्थ उद्यानासमोर शनिवारी सकाळी उस्मानपुऱ्यातील गगन पगारे व म्हाडा कॉलनीतील गौरव काथार यांची अँटिजन टेस्ट झाली. दोघे पॉझिटिव्ह निघाले. मात्र त्यांनी तळणी (जि.जालना) येथील अलोक राठोड व अतुल सदावर्ते यांना मेल्ट्रॉन रुग्णालयात दाखल केले. हे दोघेही बीएससीचे विद्यार्थी आहेत. त्यांना सिडको परिसरातील विजय मापारी, साबळे यांनी शनिवारी दुपारी साडेतीन वाजता मेल्ट्रॉनमध्ये आणले होते.

दरम्यान, आपण कोव्हिड रुग्णालयात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या नावाने भरती झालो आहोत, हे कळल्यावर दोन्ही डमी रुग्णांचा गोंधळ उडाला. त्यांनी डिस्चार्ज करण्यासाठी तगादा लावला. त्यामुळे मेल्ट्रॉनच्या डॉ. वैशाली मुदगडकर यांना शंका आली. त्यांनी अधिक चौकशी केली असचा सर्व प्रकार समोर आला.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे