आपल खान्देश

श्रमिक कलाकार व कामगार कल्याण बहुउद्देशीय मंडळाचा एसटी बंदला पाठींबा!


जळगाव (प्रतिनिधी) एसटी महामंडळ महाराष्ट्र शासना मध्ये विलीन करावे व त्यांचे पगारामध्मये वाढ करावी या विविध मागणीसाठी श्रमिक कलाकार व कामगार कल्याण बहुउद्देशीय मंडळ महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष तानाजी कुराडे साहेब यांच्या आदेशाने व पश्चिम महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राजाराम पवार यांच्या अध्यक्षतेखाली जळगाव जिल्हा सचिव सविता माळी यांचा जाहीर पाठिंबा.

राज्य शासनाने लवकरात लवकर एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न मिटून घ्यावेत सर्वसामान्य जनतेची एसटी विना फरपट होत आहे शालेय विद्यार्थ्यांचे फार नुकसान होत आहे तरी राज्य शासनाने रापम राज्य शासनामध्ये विलीनीकरण व एसटी कर्मचाऱ्यांना शासकीय दर्जा मिळावा व महाराष्ट्रभर एसटी कर्मचाऱ्यांचे निलंबन होत आहेत ते निलंबन थांबवावे या मागणीसाठी श्रमिक कलाकार व कामगार कल्याण बहुउद्देशीय महाराष्ट्र राज्य जळगाव जिल्हा सचिव सविता माळी यांनी मागणी केली आहे.


बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे