ब्रेकिंग

ओम हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर पाचोरा येथे जागतिक मधुमेह दिवसानिमित्त मधुमेह व उच्च रक्तदाब तपासणी महाशिबीर संपन्न

डॉ अजयसिंग परदेशी यांचे हॉस्पिटल मधील नर्सिंग व कुशल स्टाफ ने दोन दिवस मोफत सेवा दिली,


पाचोरा (प्रतिनिधी)जागतिक मधुमेह दिवसाचे औचित्य साधून डॉ. अजय सिंग परदेशी यांचे पाचोरा येथील ओम हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर देशमुख वाडी येथील हॉस्पिटल मध्ये 14 नोव्हेंबर व 15 नोव्हेंबर या दोन दिवसीय मोफत मधुमेह व उच्च रक्तदाब शिबिराचे आयोजन करून 10 ते 2 यावेळेत घेण्यात आले, या शिबिराचा जवळजवळ 250 रुग्णांनी लाभ घेतला असून यात आधुनिक मधुमेह निदान व उपचार पद्धती चा अवलंब करण्यात आला,

यात सुमारे 45 मधुमेह रुग्णांना ॲडव्हान्स AGP मशीन लावण्यात आली तर 35 मधुमेही रुग्णांना ॲडव्हान्स CGMS मशीन लावण्यात येऊन निदानासाठी योग्य पद्धती कशा असाव्यात हे प्रतक्ष दाखविण्यात आले,   

अत्याधुनिक पद्धतीने या रुग्णांची दर 5 मिनिटांनी रक्तातील साखर तपासणीचे निरीक्षण करण्यात येऊन नोंदी देण्यात आल्या, काही उच्चदाबच्या रुग्णांना HBPM चे मशीन लावण्यात येऊन त्यांचे अचूक ब्लड प्रेशर Monitarise करण्यात येऊन अशा पद्धतीने योग्य व अचूक निदान करता येऊ शकते हे प्रत्यक्ष दाखवून यावर लागणारे औषधी ही मोफत देऊन रुग्णांना मार्गदर्शन करण्यात आले,

यावेळी डॉक्टर अजय सिंग परदेशी यांचे हॉस्पिटल मधील नर्सिंग व कुशल स्टाफ ने दोन दिवस मोफत सेवा दिली,

डॉ. अजय सिंग परदेशी म्हंटले की पुढे अशी कुठलीही मधुमेह व उच्च रक्तदाब विषयीची समस्या उद्भवल्यास आपणासाठी आम्ही ओम क्रिटिकल हॉस्पिटलचे डॉक्टर सह सर्व नर्सिंग स्टाफ माफक दरात निदान करण्यास 24 तास तत्पर आहोत, तसेच या अत्याधुनिक मशीनद्वारे योग्य निदान होत असल्याने आता आपणास इतर हॉस्पिटल वा तालुका तसेच जिल्ह्याच्या इतर ठिकाणी जाण्याची आवश्यकता भासणार नाही, सर्व अत्याधुनिक सुविधा आता आमच्या हॉस्पिटलमध्ये एकाच छताखाली एकाच ठिकाणी उपलब्ध असणार आहे, यासाठी आमचा पत्ता व्ही. पी, रोड नेरी, वाला शेजारी देशमुख वाडी पाचोरा येथे एकदा अवश्य भेट देणे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे