मुख्याध्यापकांची आरोळी. दिन “दिन” दिवाळी !
कोरोना काळामध्ये राज्यातील सर्व शाळा बंद होत्या , राष्ट्रीय संपादणूक सर्वेही नुकताच १२ नोव्हेंबर पार पडला. आता लवकरच त्याचे निकषही जाहीर होतील. आँनलाईन शिक्षणाला दुसर्या शैक्षणिक वर्षांतही सुरूवात झाली. दिड वर्ष चाललेल्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या आँनलाईन शिक्षणाला पर्याय नव्हताच. अनेक सर्वेक्षणानुसार केवळ 25 ते तीस टक्के विद्यार्थ्यांना आँनलाईन शिक्षणाचा लाभ घेतला. राज्यातील परीस्थिती, विद्यार्थ्यांची आर्थिक क्षमता. तांत्रिक सुविधा व उपलब्ध साधन सामुग्री या सर्वाचा परिणाम कोरोनाच्या काळातील शैक्षणिक परीस्थितीवर पडला.
राज्यातील कोरोनाचा प्रार्दुभाव कमी झाल्याने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उध्दव साहेब ठाकरे यांनीही टास्क फोर्सच्या अहवालानुसारच शाळा सुरू केल्या. व मुंबईसह अनेक जिल्ह्यातील आठवी ते बारावीच्या प्रत्यक्ष अध्ययन अध्यापनाला सुरूवात झाली. (अकरावी प्रवेश अद्याप झालेला नाही) शाळा सुरू करण्यासाठी स्थानिक प्रशासनाला निर्णय घेण्यास सांगितले होते. यामुळे मुख्याध्यापक व शिक्षण अधिकार्ऱ्यांवर फार मोठी जबाबदारी आली होती. कारण प्रशासनाने जणुकाही आपली जबाबदारी दुसर्या घटकावर ढकलून आपला बचाव केला होता. प्रत्यक्षात शिक्षणाला सुरुवात होतानाच शालेय शिक्षणाचे पहिल्या सत्राच्या शेवटी होणारी प्रथम सत्र परीक्षा सुरू झाली. प्रथम सत्र परीक्षा काही ठिकाणी आँनलाईन तर काही ठिकाणी आँफलाईन पध्दतीने सुरु झाली. कारण निर्णय स्थानिक पातळीवर घेण्यात आला होता. मुंबई सारख्या शहरातही शाळांमध्ये आँनलाईन तर कुठे आँफलाईन परीक्षा पार पडल्या. मुख्याध्यापकांनी आपल्यापरीने निर्णय घेतल्याने एकाच विभागात असलेल्या शाळांमध्ये परस्पर विरोधी चित्र पाहायला मिळाले. प्रथम सत्र परीक्षा संपत असतानाच शिक्षण विभागाकडून स्थानिक पातळीवर दिवाळी सुट्टीचे परीपत्रके निघाली आणि राज्यातील शिक्षकांना व विद्यार्थ्याना दिपावलीच्या सुट्टीचा आनंद विस नोव्हेंबर पर्यंत मिळेल असे वाटले. पण त्यांच्या दिवाळी सुट्टीच्या आनंदावर विरजन पडले. अठ्ठावीस आँक्टोंबर ते दहा नोव्हेंबर पर्यंतच शाळांना दिवाळीच्या सुट्ट्या असतील असे परीपत्रक शालेय शिक्षण विभागाने २७ आँक्टोंबर रोजी जाहीर केले.एक दिवस आधी संध्याकाळी. व माननीय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी आपल्या दिपावलीच्या शुभेच्छा ट्विटरवर जाहीर केल्याने शिक्षण क्षेत्रात “काहूर “माजले.
मुळातच शिक्षक असलेल्या शिक्षकांनी आपली लेखणी पाजळली. शिक्षक संघटनेच्यावतीने मुख्यमंत्री, शिक्षण मंत्री, पालक मंत्री, शिक्षण अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे सुट्टीवरील “अन्याया “विरूद्ध आवाज उठवला गेला. राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षणात शाळांना सहभागी होण्यासाठी राज्यातील सर्व शाळा बारा नोव्हेंबर रोजी सुरू झाल्या. पण या ठिकाणी केवळ निवडकच शाळा निवडल्या गेल्या यामुळे सर्वच शाळा या सर्वेक्षणासाठी सहभागी नसल्याने दिवाळीच्या सुट्टीचे काही ठिकाणी “दिवाळे” वाजले तर काही ठिकाणी “दिवाळी झाली.प्रत्येक संघटनांनी केवळ आमच्या मुळेच शिक्षकांची, विद्यार्थी यांची सुट्टी वाढली असे फटाके फोडायला सुरुवात केली. त्या नंतर आले एक परीपत्रक. या नुसार सुट्टी घेण्याचा अधिकार मुख्याध्यापकांनी घ्या. वर्षाला शहात्तर दिवसापर्यंत सुट्टी घेण्यात याव्यात व तो निर्णय घेताना मुख्याध्यापकांची डोकेदुखी वाढली. एकाच राज्यातील एकाच जिल्ह्यातील इतकेच नव्हे तर एकाच विभागातील आसपासच्या शाळा काही ठिकाणी १५ नोव्हेंबर तर काही ठिकाणी २२नोव्हेबर तर रोजी सुरू होणार आहेत तर काही ठिकाणी १२ नोव्हेंबर पासून शाळा सुरूही झाल्या आहेत. कुठे “आँन” तर कुठे “आँफ” लाइनीत शिक्षण चालू आहे. प्राथमिक शिक्षणाच्या सुरुवातीच्या घोषणा अद्यापही बाकी आहे.
मुख्याध्यापकांना मात्र अनेकांच्या “रोषणाई “ला सामोरे जावे लागले आहे. या संदर्भात आमच्या शैक्षणिक विशेष प्रतिनिधीनी राज्यातील शिक्षकांच्या घेतलेल्या या बोलक्या प्रतिक्रिया मात्र “दिवाळी “नंतरही फटाके वाजवून जातात.
विजय महाजन यांनी मुख्याध्यापकांच्या आसपासच्या शाळा बंद असल्याचे निदर्शनास आणून दिले व आपल्या शाळेला दिवाळी सुट्टी देण्यात यावी अशी मागणी केली तर प्रकाश द्विवेदी यांनी आता शाळा सुरू ठेवून ख्रिसमस सुट्टी वाढवून देण्याची मागणी केली तर सुचिता जैन यांनी मात्र शासकीय परीपत्रकाप्रमाणे शाळा सुरू करण्यासाठी मुख्याध्यापकांना विनंती केली. अंजना देसाई यांनी दिवाळीच्या सुट्ट्याच्या गोंधळामुळे प्रवासाच्या बेताचे दिवाळे वाजले अशी खंत व्यक्त केली.तर जितेंद्र श्रीनिवासन या पालकांनी मात्र मात्र शिक्षकांच्या सुट्टी बाबत आक्षेप व्यक्त केला. शिक्षकांच्या या विचित्र मागणीमुळे मात्र शाळेचे मुख्याध्यापक मात्र कात्रीत सापडले आहेत. शाळा नेमक्या कशा सुरू करायच्या याच्या विचारात मुख्याध्यापक पडले आहेत. शासनाने शाळा सुरू करण्यासाठी एकच सुसुत्रता ठेवावी अशी मागणी उपनगरातील एका मुख्याध्यापकांनी नाव न सांगण्याच्या अटीवर केली आहे.शिक्षकाच्या सुट्टीचा “विनोदाच्या तावडीतून सुटून होणारा सुट्टीचा ” वर्षा”व काय कवाड घेणार हे लवकरच कळेल!




