ब्रेकिंग

RTE Admition | आटीई प्रवेश प्रक्रियेसाठी मुदतवाढ द्या; पालकांची मागणी 

आरटीईअंतर्गत २५ टक्के प्रवेश प्रक्रियेद्वारे खासगी इंग्रजी शाळांतील प्रवेशासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा ऑनलाइन प्रवेश निश्चित करताना पालकांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे एक आठवड्याची मुदतवाढ मिळावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

आरटीईअंतर्गत २५ टक्के आरक्षित जागांवरील प्रवेशासाठी (25 percent admission process under RTE) खासगी इंग्रजी शाळांमधील प्रवेशास निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा ऑनलाइन प्रवेश निश्चित करताना पालकांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे ऑनलाइन प्रवेशाची मुदत एका आठवड्याने वाढवून मिळावी (The admission process should be extended)अशी मागणी अनेक पालक आणि संघटनांकडून (Demand from parents and organizations) केली जात आहे.  

RTE प्रवेश प्रक्रियेतून निवड झालेल्या पाल्यांचे प्रवेश ३१ जुलै पर्यंत करण्यास मुदत देण्यात आली आहे. असे असताना ३० जुलैपर्यंत आरटीई प्रवेशासाठी निवड झालेल्या ९३ हजार ९ पैकी केवळ २७ हजार २५७ पाल्यांचे प्रवेश निश्चित करण्यात आले आहेत. परिणामी जवळपास ६० टक्के पाल्यांचे प्रवेश बाकी आहेत. त्यामुळे प्रवेशासाठी एक आठवड्याची मुदत वाढवून देण्याची मागणी केली जात आहे.

राज्यात RTE प्रवेशासाठी ९ हजार २१७ शाळांमध्ये 1 लाख 5 हजार 242 जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. त्यासाठी राज्यातून 2 लाख 42 हजार 516 विद्यार्थ्यांचे अर्ज आले आहेत. त्यापैकी 93 हजार 9 विद्यार्थ्यांची लकी ड्रॉच्या माध्यमातून झाली निवड आहे. प्रवेशासाठी 93 हजार 9 विद्यार्थ्यांची निवड होऊन देखील केवळ 27 हजार 257 विद्यार्थ्यांचे प्रवेश आतापर्यंत कन्फर्म झाले आहेत. म्हणेजच, निवड झालेल्यांपैकी तब्बल 65 हजार 752 पाल्यांचे अर्ज अजूनही कन्फर्म झालेले नाहीत. त्यामुळे RTE प्रवेशासाठी पालकांची शिक्षण विभागाकडे मुदतवाढ देण्याची मागणी केली जात आहेत. पहिला टप्पा म्हणून एक आठवडा म्हणजे किमान ६ ऑगस्टपर्यंत आरटीई प्रवेश प्रक्रियेची मुदत वाढवून देण्यात यावी अशी मागणी करणारे लेखी पत्र संघटनेकडून प्राथमिक शिक्षण संचालक यांना दिले आहे. आम्हाला शिक्षण विभागाकडून सकारात्मक उत्तर देण्यात आले आहे.  

____________________________

 

 


 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे