आपल खान्देश

Distribution of grain : ”धान्य वाटप मशिन सर्व्हरच्या अडचणी विरोधात, पाचोऱ्यात काँग्रेसचे ढोल बजाव आंदोलन..

  • दिलीप जय परदेशी

पाचोरा गेल्या काही दिवसापासून धान्य वाटप (Distribution of grain) करणाऱ्या मशिनच्या सर्व्हरला (Machine Server) अडचण येत असल्यामुळे दुकानदारांना जुलै महिन्याचे धान्य वाटप करता आले नाही,  महिन्याभरापासून रेशन लाभार्थी पाचोरा तालुक्यातील व शहरातील सर्वच गोरगरीब जनता ही रेशनच्या धान्यां पासून वंचित झालेली आहे, शासनाला जागे करण्यासाठी काँग्रेसने तालुकाध्यक्ष सचिन सोमवंशी यांच्या नेतृत्वात ढोल बजाव आंदोल करण्यात आले.

धान्य वाटप करणारे पाँज मशिनचे सर्व्हर बंद असल्यामुळे जुलै महिन्याचे धान्य वाटप करण्यास अडथळे येत आहेत. कार्डधारक व दुकानदारही मशिन बंद असल्यामुळे वैतागले आहेत. कार्डधारक चकरा मारत असून तो राग दुकानदारावरच व्यक्त केला जात आहे, पाचोरा तालुक्यातील व शहरातील सर्वच गोरगरीब जनता ही रेशनच्या धान्यां पासून वंचित आहे. सत्ताधारी आणि शासन झोपेचे सोंग घेत असून यांना जागे करण्यासाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस तालुकाध्यक्ष सचिन सोमवंशी यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज चौक व उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या समोर ढोल बजाव आंदोलन करून शासनाला जागे करण्याचे काम पाचोरा काँग्रेस तालुकाध्यक्ष सचिन सोमवंशी आणि काँग्रेस शहराध्यक्ष अँड अमजद पठाण यांच्या नेतृत्वात ढोल बजाव आंदोल करण्यात आले. त्यानंतर पाचोरा तालुका उपविभागीय अधिकारी भूषण अहिरे यांनी घेऊन पाचोरा भडगाव तालुक्यातील लाभार्थी जनतेला तात्काळ धान्य पुरवठा ऑफलाइन करण्याचे आदेश पारित करण्यात आले.

यावेळी शेख इस्माईल शेख फकीरा, जिल्हा सरचिटणीस प्रताप पाटील, जिल्हा उपाध्यक्ष शरीफ खाटीक,जिल्हा सचिव इरफान मनियार, युवक विधानसभा अध्यक्ष प्रदीप पाटील, उपाध्यक्ष कल्पेश येवले, झानेश्वर पाटील, महिला जिल्हा सरचिटणीस संगीता नेवे, उपाध्यक्षा कुसुमताई पाटील डॉक्टर सेल तालुका अध्यक्ष डॉ. मंजूर खाटीक, ओबीसी सेल तालुका अध्यक्ष शरीफ शेख, तालुका उपाध्यक्ष सुनील पाटील, शहर उपाध्यक्ष गणेश पाटील, पिंपळगाव प्रकाश चव्हाण, संदिप पाटील वाघुलखेडा, दिगंबर पाटील, शंकर सोनवणे, अल्ताफ खान, अजीम देशमुख, नदीम शेख, आबिद शेख जाबीर बागवान, मुस्तगिर टकारी, नईम मन्यार, रवी पावरा, सै. सय्यद युनुस मणियार, सचिन सोनवणे, आतिश सोनवणे आदी उपस्थित होते. आंदोलनाची चर्चा पाचोरा – भडगाव तालुक्यात होती.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे