ब्रेकिंग

पाचोरा पोलिसांनी चोरीच्या १५ दुचाकींसह दोघांना केली अटक !

जिल्ह्यातील अनेक शहरातून दुचाकी चोरीच्या घटना नियमित घडत असतांना नुकतेच पोलिसांनी १५ चोरीच्या दुचाकीचा उलगडा केला आहे. पाचोरा तालुक्यातील विविध भागातून दुचाकींची चोरी करणाऱ्या दोन संशयित आरोपींना छत्रपती शिवाजी महाराज चौकातून चोरीच्या १५ दुचाकींसह पाचोरा पोलिसांनी अटक केल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी माहिती दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पाचोरा पोलीस ठाण्याच्या हद्दीसह इतर भागातून विविध प्रकारच्या चोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले होते. या संदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी गुन्हे उघड करण्याच्या सुचना दिल्या होत्या. त्यानुसार पाचोरा उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय येरूळे यांच्या सूचनेनुसार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक पवार यांना पाचोरा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात दुचाकी चोरीतील संशयित आरोपी हे दुचाकीवर फिरत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने कारवाई करत संशयित आरोपी विशाल पांडुरंग पाटील वय-२६, रा. गजानन नगर, पाचोरा आणि रवींद्र बाबुराव पाटील वय-२९ रा. गोंडगाव तालुका भडगाव या दोघांना चोरीची दुचाकी क्रमांक (एमएच १९ डीई १८१०) सह पाचोरा पोलीसांनी अटक केली आहे. त्यांची अधिक चौकशी केली असता त्यांनी इतर चोरीच्या १४ अश्या एकुण चोरीच्या १५ दुचाकी काढून दिल्या आहेत. ही कारवाई पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोकॉ राहुल शिंपी, रणजीत पाटील, श्यामकांत पाटील, योगेश पाटील, विनोद बेलदार, सचिन पवार, हरीश अहिरे आणि सुनील पाटील यांनी केली आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे