महाराष्ट्र

लाडकी बहीण’ योजनेसाठी पैसे नसतील तर राज्यपालांचा बंगला विका…!

लाडकी बहीण’ योजनेसाठी पैसे नसतील तर राज्यपालांचा बंगला विका अन्…, आमदार बच्चू कडूंचा खोचक टोला

लाडकी बहीण योजनेसाठी पैसे नसतील तर राज्यपालांचा बंगला विका, असं वक्तव्य प्रहार संघटनेचे नेते आमदार बच्चू कडू यांनी केलं आहे. इतकंच नाहीतर राज्यपालांचा तब्बल ४० एकरातील बंगला विकला तर १ लाख कोटी येतील, असं म्हणत बच्चू कडू यांनी सरकारलाच खोचक टोला लगावला आहे. कष्ट करणाऱ्यांसाठी देखील सरकारने एखादी चांगली योजना जाहीर करायला हवी. राज्य सरकारला एक चांगला सल्ला दिला आहे की, मुंबईत राज्यपालांचा बंगला आहे. हा बंगला ४० एकरात आहे.

राज्यपालाला ४० एकरचा बंगला कशाला पाहिजे, त्यामुळे राज्यपालांचा तब्बल ४० एकरातील बंगला विकला तर १ लाख कोटी रूपये मिळतील, असे बच्चू कडू यांनी म्हटले असून सरकारला टोला लगावला आहे. तर चार ते पाच मजल्यांचा स्वतंत्र बंगला राज्यपालांना बांधून द्यावा, अशी खोचक टीकाही बच्चू कडू यांनी केली. इतकंच नाहीतर राज्यपालांसाठी असलेल्या बंगल्याची ४० एकरातील जागा विकून येणाऱ्या पैशातून कष्ट करणाऱ्यांसाठी चांगली योजना जाहीर करा, असंही बच्चू कडू म्हणाले.

 

 

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे