आपल खान्देश

ग्रामीण युवापत्रकार संघाच्या जिल्हाध्यक्षपदी दिनेश चौधरी, उपाध्यक्षपदी सागर लव्हाळे यांची निवड…


द ग्रामीण युवा पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष शेख अन्सार शेख आणि राज्य कार्याध्यक्ष अनिल करंदकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाध्यक्षपदी दिनेश चौधरी आणि उपाध्यक्षपदी सागर लव्हाळे यांची नियुक्ती केली आहे.

जिल्हा सचिव मोहन पंडित दुबे, जिल्हा कार्याध्यक्षपदी किरण अनंतराव चौधरी, जिल्हा संपर्कप्रमुख चंद्रकांत शांताराम पाटील, जिल्हा सहसचिव शंकर रंगनाथ भांमेरे, जिल्हा संघटक संतोष रमेश महाले, जिल्हा खजिनदार सुनील रमेश लोहार, तसेच जिल्हा कायदेशीर सल्लागार म्हणून ऍड. शिवाजी गोरे यांची नियुक्ती करण्यात आली.यावेळी संघाचे अध्यक्ष यांनी सर्वांना नियुक्तीपत्र देऊन त्यांची निवड केली आहे.तसेच जळगाव जिल्ह्याची कार्यकारणी ही जाहीर केली आहे. द युवा ग्रामीण पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष शेख अन्सार शेख आणि राज्य कार्यअध्यक्ष अनिल करंदकर यांनी संपूर्ण जिल्हा कार्यकारणीचे द  ग्रामीण युवा पत्रकार संघामध्ये स्वागत केले आहे. संघाचे कार्य हे अतिशय उत्कृष्ट प्रमाणे पार पाडण्यात यावे अशीही त्यांनी अपेक्षा व्यक्त केली आहे.

यावेळी जळगाव जिल्ह्याचे नव नियुक्त जिल्हाध्यक्ष दिनेश चौधरी यांनी संघाचे काम अतिशय उत्कृष्ट प्रमाणे सांभाळण्यात येईल अशीही संस्थापक अध्यक्ष यांना ग्वाही दिली आहे तसेच जिल्हाध्यक्ष या नात्याने द युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या  जिल्हाध्यक्षपदी  निवड झालेली आहे.प्रथम संस्थापक अध्यक्ष, आणि राज्य कार्याध्यक्ष या दोघांचे मी मनःपूर्वक आभार मानतो.

खूप मोठी जबाबदारी या मान्यवरांनी माझ्यावर अगदी विश्वासाने दिली आहे. मी त्या विश्वासास कदापि तडा जाऊ देणार नाही.दिलेली जबाबदारी मी माझ्या सर्व सहकाऱ्यांना विश्वासात घेऊन प्रामाणिकपणे पार पाडेल. गेल्या 28 वर्षांपासून प्रामाणिकपणे पत्रकारिता करतोय/करत राहणार!!.लवकरच तालुका निहाय कार्यकारिणी तयार करू आणि संघटनेस बळ देऊ.नक्कीच संघटनेच्या माध्यमातून  समाजकार्य करू, आणि कोणावरही अन्याय होणार नाही याची दक्षता घेऊ. संपूर्ण जिल्ह्यामध्ये तालुकाध्यक्ष आणि सदस्यांची वाढ करीन असेही जिल्हाध्यक्ष यावेळी बोलले .

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे