आपल खान्देश

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची ३०० वी जयंती– एका आदर्श महिला नेतृत्वाला वंदन..

स्त्री सक्षमीकरणाचे आदर्श असलेल्या महाराणी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची त्रिशताब्दी जयंती पाचोरा तालुक्यातील आखतवाडे, बदरखे येथे मोठया उत्साहात साजरी करण्यात आली.

भारतीय इतिहासात मोठी युद्धे झाली, साम्राज्ये उभी राहिली आणि कोसळली. परंतु, या साऱ्या घडामोडींमध्ये ज्या व्यक्तींनी आपल्या कार्याने समाजहित, धर्मरक्षण आणि जनकल्याण या मूल्यांना सर्वोच्च मान दिला, त्यात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे स्थान अग्रभागी आहे. त्यांच्या जीवनकार्याने सिद्ध केलं की एका स्त्रीचं नेतृत्व केवळ राजसिंहासनापुरतं मर्यादित राहत नाही, तर ते समाजाच्या सर्व स्तरांपर्यंत पोहोचू शकतं. अहिल्याबाई होळकर या केवळ इंदूरच्या होळकर घराण्याच्या महाराणी नव्हत्या तर त्या एक द्रष्ट्या प्रशासक, न्यायप्रिय नेत्या, धर्मपरायण समाजसुधारक आणि स्त्री सक्षमीकरणाच्या आद्य पुरस्कर्त्या होत्या. त्यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त, त्यांचे स्मरण त्यांच्या विचारांमधून नव्याने प्रेरणा घेण्याचे निमित्त आहे.

पाचोरा तालुक्यातील आखतवाडे, बदरखे गावात मोठया उत्साहात समाजसुधारक आणि स्त्री सक्षमीकरणाच्या आद्य पुरस्कर्त्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची त्रिशताब्दी जयंती साजरी करण्यात आली.

आखतवाडे कार्यक्रमास शिवसेना जिल्हा प्रमुख रावसाहेब मनोहर पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला, यावेळी आखरवाड्याचे माजी सरपंच संजय परदेशी, पो.पा. दगडुसिंह राजपुत, मच्छिंद्र गढरी, सरपंच वामन गढरी, सुनिल परदेशी, सांडु गढरी, बापु दयाराम, छोटु नाना, विकास संचालक फत्तेसिंह राजपुत, पृथ्वीराज गढरी,  जितेंद्र राजपुत, गोविंद राजपुत, महेश राजपुत, डोंगरसिंग गढरी, एकनाथ भवानसिंग, सुधाकर रामचंद्र, नवनीत मच्छिंद्र, रोहित नवनीत, रोहीदास चांगदेव, राजेंद्र नामदेव, बापु आना ई.सह समाज बांधवांसह ग्रामंस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बदरखे गावात  कार्यक्रमाला मा. उपसरपंच निंबा परदेशी, पो.पा.काशीनाथ पवार, मा.सरपंच भावडु पाटील, भाजपाचे प्रमोद परदेशी, विजय विठ्ठल, ध्रुव बाळ पाटील, भगवान परदेशी, भगवान गढरी सह समाज बांधव आणि ग्रामंस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे