आपल खान्देशआरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र
महाराष्ट्रातुन 597 तर जळगाव जिल्ह्यातुन 19 आरोग्य सेविकांना कामावरून कमी करण्यात आले!
प्रशासनाने आपल्या आदेशात पदे रद्द करण्याची प्रक्रिया दिली आहे. प्रत्येक जिल्हयाने ३१ ऑगस्टपूर्वी दिलेली पदसंख्या रिक्त करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यामध्ये आधी जिल्हयातील रिक्त पदे रद्द करण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या.
झूम मराठी जळगाव | महाराष्ट्रातुन ५९७ तर जळगाव जिल्ह्यातुन 19 आरोग्य सेविकांना कामावरून कमी करण्यात आले आहे. कोरोना काळात दोन वर्षांपासून जीवाची बाजी लावून काम करणाऱ्या कंत्राटी आरोग्य सेवकांना गरज सरो वैद्य मरो अशी वागणूक सरकारने दिली आहे.
जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांसमोर रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. अनेक वर्ष आरोग्य विभागात सेवा देऊनही शासन आम्हाला कायम करुन घेत नसेल तर आमच्यापुढे आत्महत्या कऱण्याशिवाय कोणताही पर्याय नाही, असे आरोग्य सेविकांनी म्हटले आहे.
महाराष्ट्रात ५९७ तर जळगाव जिल्ह्यातील १९ आरोग्य सेविकांच्या रोजगारावर गदा आली आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राज्यात कंत्राटी पद्धतीने कामावर घेतलेल्या आरोग्य सेवकांपैकी तब्बल ५९७ आरोग्य कर्मचाऱ्यांची सेवा सरकारने थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. पण या आरोग्य कर्मचाऱ्यांनी इतर ठिकाणी त्यांना समाविष्ट करुन घेण्याची मागणी केली आहे.
केंद्र सरकारने आपल्या आदेशात पदे रद्द करण्याची प्रक्रिया दिली आहे. प्रत्येक जिल्हयाने ३१ ऑगस्टपूर्वी दिलेली पदसंख्या रिक्त करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यामध्ये आधी जिल्हयातील रिक्त पदे रद्द करण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. त्यानंतरही रद्द करण्याची पदे शिल्लक असतील तर १ वर्षात एकही बाळंतपण न झालेल्या उपकेंद्रातील आरोग्य सेविकांची पदे रद्द करण्यास सांगण्यात आले होते. मागील एक वर्षात एकही बाळंतपण न झालेल्या उपकेंद्राची संख्या रद्द होणा-या पदापेक्षा जास्त असल्यास उपकेंद्राची २०११ च्या जनगणनेनुसार यादी तयार करुन त्यातील कमीत कमी लोकसंख्या असलेल्या उपकेंद्राची पदे रद्द करावीत असे आदेश देण्यात आले होते.
जळगाव जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत आरोग्य विभागात आरोग्य सेवक म्हणून अनेक तरुण आणि तरुणींना घेण्यात आले होते. यापैकी अनेक लोक २००५ पासून आजही कंत्राटी कर्मचारी म्हणून याच विभागात काम करत आहेत. राजकारण्यांनी अनेकवेळा त्यांना कायम करण्याची आश्वासनं दिली खरी, पण कुणाचेही आश्वासन प्रत्यक्षात उतरलेले नाही. दरवेळी या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली जात असल्याने आरोग्य संघटनेने केला आहे आरोप त्यांनी केला आहे.





