आपल खान्देशआरोग्य व शिक्षण
भातखंडे येथे सिद्धिविनायक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मार्फत रोगनिदान शिबिर आयोजन
डॉक्टर स्वप्निल दादा पाटील यांनी एक संकल्पना मांडली… खेड्यापाड्यातील गावात स्वतः जाऊन गोरगरिबांना रोग निदान शिबिर भरून सेवेची संधी दिली.
पाचोरा येथील प्रसिद्ध सिद्धिविनायक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल व भातखंडे बु. ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य असे रोगनिदान शिबिर आयोजित केले गेले. या कार्यक्रमाला त्या परिसरातील नागरिकांनी लाभ घेऊन सहकार्य केले.

हा कार्यक्रम माध्यमिक विद्यालय, भातखंडे येथे सकाळी दहा ते दोन पर्यंत करण्यात आला. यावेळी डॉक्टर स्वप्नील पाटील दादा यांनी भव्य रोग निदान शिबिर घेऊन नागरिकांची तपासणी केली. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष पंडित बाप्पू पाटील, भातखंडे गावाचे माजी सरपंच अतुल महाजन, ग्रामसेवक चंद्रकांत दादा सोमवंशी, दैनिक लोकमत प्रतिनिधी संजय पाटील, डॉ. भरत दादा पाटील, डॉ. संजय समदानी दादा , युवा नेते मनोज भाऊ पाटील, मुख्याध्यापक एस आर पाटील सर माध्यमिक विद्यालय भातखंडे बुद्रुक, बी एन पाटील सर, राहुल भाऊ पाटील ,तंटामुक्ती अध्यक्ष पितांबर आबा पाटील व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. परिसरातील नागरिकांसाठी सिद्धिविनायक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल ने आयोजित केलेल्या ह्या भव्य अश्या आरोग्य शिबिरा बद्दल ग्रामपंचायत सदस्य व नागरिकांनी डॉक्टर स्वप्निल पाटील दादा यांचे आभार मानले.




