महाराष्ट्र
धाडसी “पठाण आदिल आय्युब खान”
धाडसी “पठाण आदिल आय्युब खानया मुलाचे खरंच कौतुक करावे तेवढे कमीच, त्याच्या धाडसीपणाला दाद द्यावी तितकी कमीच आहे.
आय सी आय सी बँक लुटून तसेच एकीला जिवे मारून आणि दुसरीला गंभीर जख़मी करुन पळून जात असताना, हातात हत्यार, लुटीचा माल आणि डोक्यात खुनशी वृत्ती अश्या दुबे नावाच्या आतंकी, दरोडेखोर, राष्ट्रद्रोही, नराधमाला विरार येथील स्थानिक रहिवासी असलेला पठाण आदिल आय्युब खान या तरुण युवकाने स्वतःच्या जीवाचा ही विचार न करता पाठलाग करून पकडले आणि बाकी नागरिकांच्या साहाय्याने मुद्देमालासहित पोलिसांच्या स्वाधीन केले.
या विरार स्थाईक धाडसी पठाण आदिल आय्युब खान तरुणांच्या धाडसाची दखल विरार पोलिसांनी त्वरित घेऊन त्याला व सोबत ज्यांनी मदत केली अश्यांना पुष्पगुच्छ आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
त्याच्या या धाडसाची दखल आय सी आय सी आय बँक आणि राज्यशासनानेही घ्यावी.





