आपल खान्देश
स्वातंत्र्यदिनानिमित्त पाचोरा नगर परिषदेच्यावतीने वृक्ष लागवड
पाचोरा दि १५ ऑगस्ट २०२१ रोजी ७५ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पाचोरा नगर परिषदेच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पावर माझी वसुंधरा अभियान २.० अंतर्गत देशी झाडे जसे वड , पिंपळ , कडुलिंब , जांभूळ अशा झाडांची लागवड करण्यात आली.

यावेळी मुख्याधिकारी शोभा बाविस्कर, नगर अभियंता मधुकर सुर्यवंशी,आरोग्य निरीक्षक धनराज पाटिल, प्र. अधिकारी प्रकाश दत्तात्रय भोसले, लिडींग फायरमन राजेश कंडारे, माजी स्विकृत सदस्य रणजीत पाटिल सर तसेच नगरपरिषदेचे विविध विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

‘माझी वसुंधरा’ अभियानाअंतर्गत पाचोरा नगरपरिषदेने घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प येथे निर्माण होणाऱ्या सेंद्रिय खताचा वापर करून विविध प्रकारच्या फुलांची फुलबाग फुलवली आहे त्यामुळे घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प परिसर अधिकच खुलून दिसतोय





