आपल खान्देश
पाचोरा तालुक्यातील शक्ती केंद्र प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक संपन्न
पाचोरा तालुक्यातील शक्ती केंद्र प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक “अटल” कार्यालयात संपन्न झाली
पाचोरा (प्रतिनिधी) पाचोरा तालुक्यातील शक्ती केंद्र प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक “अटल” कार्यालयात संपन्न झाली यावेळी कार्यकर्त्यांना भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त शुभेच्छा दिल्या

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील भारत घडविण्यासाठी आपण आपल्या शक्ती केंद्राच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या योजना विकासाच्या योजना तळागाळापर्यंत पोहचविण्यासाठी पक्षवाढीसाठी तसेच समर्थ बूथ करण्यासाठी झोकून द्यावे. असे आवाहन केले यावेळी आमदार तथा जिल्हाध्यक्ष राजूमामा भोळे यांनी कार्यकर्त्यांना पक्ष संघटना मध्ये शक्ती केंद्रप्रमुख हा महत्त्वाचा घटक असून आपण समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत लाभ देण्यासाठी जोमाने काम केल्यास पक्षाचा विस्तार व विकास होईल. आणि पक्षाला अधिकाधीक यश मिळेल. भाजप पाचोरा तालुकाध्यक्ष अमोलभाऊ शिंदे यांनी प्रास्तविक केले.हभप ज्ञानेश्र्वर जळकेकर महाराज यांनी कार्यकर्त्यांना विवीध दाखले देत संबोधित केले. व्यासपीठावर बाजार समितीचे सभापती सतिशबापू शिंदे, जिल्हा सरचिटणीस सचिन पान पाटील, भाजप शहराध्यक्ष रमेशभाऊ वाणी,भडगाव माजी तालुकाध्यक्ष सोमनाथ पाटील, भाजप.जिल्हा सरचिटणीस तथा जि.प.
सदस्य मधुभाऊ काटे,ह.भ.प. ज्ञानेश्र्वर जळकेकर महाराज. तालुका सरचिटणीस गोविंद शेलार, संजय पाटील,माजी सभापती बन्सीलाल पाटील, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष मुकेश पाटील, शहराध्यक्ष समाधान मुळे, परेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.




