पीडीत व्यक्तीला न्याय द्या अन्यथा जन आंदोलन करू समता सैनिक दल
छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील नागद येथील समाजिक कार्यकर्ते व माजी सरपंच राजधर प्रकाश आहिरे यांनी गेल्या चार दिवसा पासून आपल्यावर झालेल्या राजकीय दबावा पोटी प्रशासकीय अन्ययाच्या विरोधात अमरण उपोषणाचा पावित्र्य हाती घेतला आहे. त्याच्या या आंदोलनाला पाठबळ मिळावा म्हणून आज नागदगांव हे स्थानिक समाज बांधव व समता सैनिक दलाच्या वतीने बंद पुकारले होते.
सदर बंदला प्रतिसाद मिळावा,पिढीताला पाठिंबा व न्याय मिळवून देण्यासाठी समता सैनिक दलाचे जळगाव जिल्हा अध्यक्ष व छ.संभाजी नगर जिल्हा प्रभारी जिल्हा अध्यक्ष किशोर डोंगरे, भडगाव तालुका प्रभारी अध्यक्ष ज्ञानेश्वर सावळे यांनी उपोषण स्थळी भेट घेतली. संबधित प्रकरणाची संपूर्ण माहिती घेत सहाय्यक जिल्हाधिकारी यांना फोन करून सांगितले की, सदर पिढीताची मागणी योग्य आसुन आप मा.खंडपीठाच्या निर्णायाचा आवमान केला आहे.तरी संबंधित पिढीतास न्याय न मिळाल्यास आम्ही जन आंदोलन उभे करु असे ठणकावून सांगितले.
सबंधित प्रकणाची सविस्तर वृत्तांत असे की,गेल्या दोन वर्षे पूर्वी राजधर आहिरे हे नागद येथील ग्रामपंचायत येथे सदस्य म्हणून निवडून आले असुन सरपंचपदी विराजमान होते,परंतु काही लोकांनी त्याच्या विरोधात खोटी तक्रार करत ते अतिक्रमीत जागेवर राहतात म्हणून मा.जिल्हाधिकारी छ.संभाजी नगर येथे तक्रार केली होती, या प्रकराची दखल घेत त्याची उमेदवारी रद्द करण्यात आली, या निर्णयाच्या विरोधात न्यायलयात लढा सुरु झाला व हा दावा खोटा ठरला हे तपासा नंतर सिध्द झाले, खंडपीठच्या आदेशानुसार त्याना न्याय मिळायला हवा होता परंतु त्या आदेशाचा अवमान करत संबंधित अधिकारी यांनी त्या गावात 30 दिवसाच्या आत फेर निवडून लावून दुसरा व्यक्ती सरपंचपदी निवडून आला व या सर्व घटनेमुळे राजधर आहिरे यांच्यावर अन्याय झाला, म्हणून त्यांना न्याय मिळावा यासाठी समता सैनिक दलाच्या वतीने पाठिंबा व लढा उभा करण्यात आला व पुढे सुध्द हा लढा तिव्र करण्यात येणार आहे.
या वेळी समता सैनिक दलाचे प्रमुख सैनिक उपस्थित होते. शुभम आहीरे, रविंद्र आहिरे, राहुल मोरे, भाऊसाहेब भीमराव अहिरे, योगेश गडवे, समाधान खैरनार, मनोज गडवे, सागर बागुल रूपचंद कोळी, समाधान शेलार, बाबुराव महिरे, साईनाथ संसारे, समाधान सूर्यवंशी, गणेश निकम उपस्थित होते.



